शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

पालकांवर होणार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By admin | Updated: April 29, 2017 16:02 IST

मुलांची हौस ठरणार डोकेदूखी : परिक्षेत्रात ५० हजार ३७९ वाहनांवर कारवाई : विश्वास नांगरे-पाटील

 लोकमत आॅनलाईन

कोल्हापूर, दि. २९ : अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल त्यांची जीवघेणी ठरत आहे. बेफिकीर पालकही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे. या मुलांच्या ‘धूम स्टाईल’च्या हौसेपुढे पादचारी नागरिकांच्या जिवालाही धोका पोहोचत आहे. अठरा वर्षांखालील मुले गाडी चालविताना मिळाल्यास दंड होईलचं. त्याशिवाय त्यांच्याकडून कोणास दूखापत होवून मृत्यू झाल्यास पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी दिली.

दरम्यान परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५० हजार ३७९ वाहनांवर कारवाई करुन १ कोटी १० लाख ३१ हजार १२० रुपये दंड वसुल केला. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलिस प्रशासनाने दि. १७ ते १८ व २४ ते २५ एप्रिल या चार दिवसांत ही मोहिम राबवली आहे. प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस ही कारवाई सुरु राहणार आहे.

वाहनांची संख्या वाढल्याने पाचही जिल्ह्यातील शहरासह इतर पर्यटनस्थळी वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वाहनधारक नियमबाह्य वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले होते. पाच जिल्ह्यातील वाहतुक समस्येचा आढावा स्वत: सायकल वरुन फिरुन घेतला. गेल्या वतीन वर्षात अपघाती मृतांची संख्या जास्त आहे. अपघात होऊ नयेत, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यात मोटर व्हेईकल अ‍ॅक्टनुसार नियमबाह्य वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश १४३ पोलिस ठाण्यांना दिले.

दि. १७ ते १८ व २४ ते २५ एप्रिल या चार दिवसात सकाळी नऊच्या सुमारास पोलिस रस्त्यावर उतरले. चौका-चौकांत प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहने तपासली गेली. यावेळी परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट, मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली.

कागदपत्रांची पाहणी करून नियमबाह्य आढळणाऱ्या वाहनचालकांना जाग्यावर २०० ते ५०० रुपये दंडाची पावती दिली गेली. बहुतांशी पाच जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नसणाऱ्यांवर कारवाई झाली. ही कारवाई येथून पुढे आठवड्यातील कोणत्याही दोन दिवस निवडून केली जाणार आहे. परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत वाहनांची रहदारी वाढल्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंग नसतानाही वाहने अस्ताव्यस्त उभी केली जातात. त्यामुळे वाहनधारकाला समोरच्या वाहनाला ओलांडून जाताना अपघाताला सामोरे जावे लागते. शासकीय कर्मचारी असो, किंवा महाविद्यालयीन तरुण वाहन चालविताना मोबाईलवर बोलत जाणे ही त्यांची ‘स्टाईल’च बनली आहे. त्याचा परिणाम म्हणून अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.अज्ञान मुलांच्या हातात दूचाकी देवून अनेक पादचाऱ्यांचे जिव धोक्यात आले आहेत. त्यासाठी आता मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या मुलांच्या पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.

चालकांची तपासणी पूणे-बेंगलोर महामार्गावर ट्रक चालक मद्यपान, नशेली पदार्थ घेवून वाहने चालवित असतात. त्यामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करुन प्रत्येक वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे.

पाच जिल्ह्यांतील वर्षभरातील अपघाती मृतांची संखा

२०१५-२७८८

२०१६-२८३०

२०१७-६३९ (३१ मार्च अखेर)

 

जिल्हा      केसेस      दंड

 

कोल्हापूर    १२०३१        २४४८०००

सांगली        ८५१५         १७२४१००

सातारा          ७०३१       १५९५६००

सोलापूर ग्रामीण ९२०४     १६१२९२०

पुणे ग्रामीण  १३५९८        ३६५०५००