शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पारधी समाजाचे देशासाठी बलिदान- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 01:11 IST

सूर्यादय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेचे उद्घाटन

पुणे : परकीयांच्या आक्रमणाच्या वेळी लढा देणारा हा पारधी समाज आहे. देशासाठी पारधी समाजाने अनेकदा आपले बलिदान दिलेले आहे. ही बाब आपण मात्र विसरलो आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर पारधी समाजाबद्दल आपली संवेदना जागृत झाली आहे. आपला धर्म, देश, राष्टÑ, संस्कृती हे एक अखंड शरीर आहे. शरीराप्रमाणे समाजातील प्रत्येक वर्ग हा सबळ, सशक्त आणि सुदृढ व्हावा यासाठी समाजाने प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतयांनी केले.भैय्यूजी महाराजांनी सुरू केलेल्या व अमनोरा येस फाऊंडेशनचे माध्यमातून वसतिगृह शाळा उभारणीची जबाबदारी घेतलेल्या सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहांच्या उद्घाटनप्रसंगी सरसंघचालक बोलत होते. अमनोरा येस फाऊंडेशनचे अनिरुद्ध देशपांडे, चंद्रशेखर राठी, दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्टच्या डॉ. आयुषी देशमुख, प्रशांत देशमुख, माधुरी देशमुख उपस्थित होते. आर्किटेक्ट संदीप बावडेकर, ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे, स्ट्रक्चरल इंजिनिअर सादवानी यांचा सरसंघचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या निमित्ताने राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पारधी समाजासाठी काम करणाऱ्या १०० संस्थांच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत विभागीय पारधी परिषद घेण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांचे योगासन प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, मूर्तीकला, शिल्पकला प्रदर्शन, तबला व हार्मोनिअमवादन प्रात्याक्षिक केले. कथ्थक नृत्य सादर केले. अमनोरा येस फाऊंडेशनचे विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ गोरे यांनी आभार मानले.शाळेमध्ये मुलांचे-मुलींचे वसतिगृह, भोजनगृह, सर्व १० वर्गात ई-लर्निंगचे प्रोजेक्टर्स, किंडर स्पोर्ट्सकडून मुलांना खेळाचे प्रशिक्षण या सुविधांबरोबरच भविष्यात स्पोर्ट्स अकादमी सुरू करणार असल्याचे तसेच, ग्रामीण भागातील हुशार, गरीब-गरजू, होतकरू विद्यार्थ्यांसाठी सेंटर आॅफ एक्लन्स पुणे येथे पुढच्या वर्षी सुरू करणार असल्याची माहिती अमनोरा येस फाऊंडेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांनी प्रास्ताविकात दिली.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ