शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १२ वर्षांंनंतरही रेल्वेतील पार्सलचे ‘ट्रॅकिंग’ अद्यापही कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 12:03 IST

दिल्लीमध्ये हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर इतरत्र त्याची सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण...

ठळक मुद्दे२००६ मध्ये पहिल्यांदा दिल्लीमध्ये‘पीएमएस’ची चाचणी यशस्वी सध्या पार्सलचे सर्व काम कागदावरच ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर नागरिकांना पार्सलचे ट्रॅकिंग करणे सोपे

पुणे : नागरिकांना आपले पार्सलचे ऑनलाईन ट्रॅकिंग करता यावे यासाठी २००६ मध्ये पहिल्यांदा दिल्ली स्थानकावर पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यानंतर या टप्प्यात पुण्यातही प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार होती. पण अद्यापही ही ट्रॅकिंग प्रणाली कागदावरच आहे. ही प्रणाली तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दिल्ली रेल्वे स्थानकावर दि. १ नोव्हेंबर २००६ रोजी ‘पार्सल मॅनेजमेंट सिस्टीम’ (पीएमएस)ची अंमलबजावणी सुरू झाली. या प्रकल्पामध्ये मध्य रेल्वेतील पुण्यासह नागपुर, मुंबई व भुसावळ स्थानकांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. दिल्लीमध्ये हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर इतरत्र त्याची सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण अजूनही ही प्रणाली अद्ययावत करण्याचेच काम सुरू असल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीस विलंब लागत आहे. या प्रणालीअंतर्गत पार्सल विभागासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून नागरिकांना आपले पार्सलचे ‘रिअल टाईम’ ट्रॅकिंग करणे सोपे होणार आहे.सध्या पार्सलचे सर्व काम कागदावरच होते. त्यामुळे नागरिकांना आपले पार्सल कोणत्या गाडीमध्ये ठेवले, कुठपर्यंत पोहचले, कोणत्या स्थानकावर उतरविले याबाबतची कोणतीच माहिती समजत नाही. पार्सल बुकिंगच्या पावतीवर नागरिकांनी संपर्क क्रमांक दिला असल्यासच रेल्वे कर्मचारी त्यांना कळवितात. मात्र, त्यालाही अनेकदा विलंब होतो. संपर्क क्रमांक नसल्याने नागरिकांनाच पार्सल विभागात येवून किंवा चौकशी करावी लागते. यामध्ये विलंब होऊन दंड भरण्याची वेळ येते. नवीन प्रणालीमुळे हा ताप वाचणार आहे. पार्सल विभागात पार्सल गेल्यानंतर त्याला स्वतंत्र बारकोड दिला जाईल. तसेच ‘प्रोग्रेसिव्ह रेफरन्स रेकॉर्ड’ (पीआरआर) क्रमांक मिळेल. त्याआधारे नागरिकांना पार्सलचे संकेतस्थळावरून ट्रॅकिंग करता येईल. या प्रणालीमध्ये शुल्क भरण्याची ऑनलाईन सुविधा असेल. -------------दिल्लीमध्ये ‘पीएमएस’ची चाचणी यशस्वी झाली आहे. मध्य रेल्वेमध्येही ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. याची चाचपणी सध्या सुरू आहे. ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर नागरिकांना पार्सलचे ट्रॅकिंग करणे सोपे होणार आहे. - संजय सिंग, सहायक वाणिज्य व्यवस्थापकपुणे विभाग, मध्य रेल्वे------------पार्सलचे पॅकिंग रेल्वेच करणारसध्या नागरिकांनाच पार्सलचे पॅकिंग करावे लागते. दुचाकी वाहनांचे पॅकिंग करायचे असल्यास पार्सल विभागाबाहेर त्यासाठी ३५० ते ४५० रुपये घेतले जातात. नागरिकांना सोसावा लागणारा हा भुर्दंड आता बंद होणार आहे. रेल्वे प्रशासनाने पॅकिंगचे काम निविदा प्रक्रिया राबवून एका खासगी संस्थेला दिले आहे. त्यांना त्याचे दरही निश्चित करून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय होणार असल्याचे संजय सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासी