शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यातील कुंभारगावावर पॅराग्लायडर्सने पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 14:45 IST

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव या ठिकाणी १ एप्रिल १९४३ मध्ये ९ पॅराशूट फिल्ड रेजिमेंट स्थापन करण्यात आली.

ठळक मुद्दे१ एप्रिल २०१८ रोजी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात कुंभारगाव येथे करण्यात आली. अभियानाचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये धाडस निर्माण होऊन या सेवेत दाखल होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी होणार आहे.

भिगवण : भारतीय सैन्य दलातील ९ पॅराशूट फिल्ड रेजिमेंटच्या सैनिकांनी इंदापूर तालुक्यातील कुंभारगावमध्ये रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पॅराग्लायडिंग केले. या वेळी जवानांनी अवकाशात हवाई उड्डाण करत कुंभारगावावर पुष्पवृष्टी करण्यात आली. इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव या ठिकाणी १ एप्रिल १९४३ मध्ये ९ पॅराशूट फिल्ड रेजिमेंट स्थापन करण्यात आली. १ एप्रिल २०१८ रोजी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात कुंभारगाव येथे करण्यात आली. ७५ वर्षांचा इतिहास असणाऱ्या या रेजिमेंटच्या जवानांनी कुंभारगाव येथे भीमा नदीच्या जलाशयाशेजारी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी पॅराग्लायडिंग कसे असते, याविषयी शाळकरी मुलांसह अनेकांना उत्सुकता होती. त्यामुळे हे जवान आकाशात उड्डाण कसे करतात, याकडे बारकाईने लक्ष देऊन होते. सकाळी नऊच्या सुमारास या मोहिमेला सुरुवात झाली. ९ पॅराशूट फिल्डच्या २ जवानांनी अवकाशात उड्डाण घेतले अन् शाळकरी मुलांनी एकच जल्लोष केला. अभियानाचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये धाडस निर्माण होऊन या सेवेत दाखल होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी होणार आहे. या अभियानामध्ये भारतीय सेनेचे निवृत्त अधिकारी प्रकाश नेरुरकर, वसंत पाटील, कर्नल रमेश आपटे  यांच्यासह २० जवान सहभागी झाले आहेत. या अभियानाचे नेतृत्व बिकेश चौहान, मेजर राहुल शर्मा, हवालदार अमरितपाल, चंद्रकांत महाडिक, रामशेट आदी सहभागी झाले आहेत. कुंभारगाव येथून या मोहिमेला सुरुवात झाली असून आग्रा येथे याची सांगता होणार आहे.  ९ पॅराशूट फिल्ड रेजिमेंटचे पॅरामीटर पायलट या मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत. हे धाडसी कार्य  भारतीय सेनेच्या आर्मी अ‍ॅडव्हेन्चर विंगद्वारे करण्यात येते. पॅरामीटरची ही रॅली १ हजार ४५३ किमीची असणार असून हे अंतर अवकाशातून पूर्ण केले जाणार आहे. नाशिक, धुळे, महू, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर या भागातून हे अभियान होत आहे. २० मार्च रोजी या अभियानाची सांगता आग्रा या ठिकाणी होत आहे.   - प्रकाश नेरुरकर, सेवानिवृत्त कॅप्टन 

टॅग्स :IndapurइंदापूरIndian Armyभारतीय जवान