शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पापडी तलाव हरितपट्ट्याची महापालिकेकडून कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 02:57 IST

विविध मोहिमा काढून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणासाठी केंद्र तसेच राज्य शासन प्रयत्न करत असले तरी केवळ मद्यधुंद वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अपघाताला समोर ठेवून पापडी तलाव येतील रस्त्याच्या कडेला असणा-या वृक्षांची वसई विरार शहर महानगरपालीकेकडून कत्तल सुरु आहे.

वसई  - विविध मोहिमा काढून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणासाठी केंद्र तसेच राज्य शासन प्रयत्न करत असले तरी केवळ मद्यधुंद वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अपघाताला समोर ठेवून पापडी तलाव येतील रस्त्याच्या कडेला असणा-या वृक्षांची वसई विरार शहर महानगरपालीकेकडून कत्तल सुरु आहे.याबाबत वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून रस्ता रु ंदीकरण तसेच विभाजनाच्या नावाखाली सुरू असलेली पर्यावरणाची हानी भविष्याची चिंता वाढवणारी ठरत आहे. विशेष म्हणजे पालिकेकडून ८ वर्षांपूर्वी पापडी रस्त्याचे रुंदीकरण करून अर्धवस्थेत सोडून देण्यात आले होते. तेथे आता गाड्यांची पार्किंग केली जात आहे.घडणाºया अपघातात ज्यांचा काहीच संबंध नाही अश्या वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. रस्ता विभागला की अपघाताचे प्रकार थांबतील असा अजब अंदाज पालिका प्रशासनाकडून लावण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांची कत्तल आवश्यक आहे का? हा सवाल वृक्षप्रेमी विचारू लागले आहेत.दारुड्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला तर रस्ता विभाजनानंतर लावण्यात येणाºया डिव्हायडर तोडूनही अपघात होऊ शकतो. त्यामुळे वृक्षतोड करण्यापेक्षा वाहनांच्या गतीवर मर्यादा कशी लावता येईल याकडे जास्त भर असणे गरजेचे असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.तोडलेली झाडे कामगारांच्या मदतीने ट्रकमध्ये भरून कुठे नेली जातात याबाबत कामगारांनाही काही सांगता येत नाही. त्यामुळे तोडलेल्या झाडांचे पुढे काय होते हे समजू शकले नाही. जेवढी झाडे तोडली जातील त्या बदल्यात दुसºया ठिकाणी झाडांचे रोपण करावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून होत आहे.हा अजिब न्याय...पापडी तलाव परिसरात आॅक्टोबर २०११ भल्यापहाटे विरुद्ध दिशेला रस्त्याच्या कडेला रिक्षासाठी उभ्या असलेल्या नागरिकांना, रिक्षा तसेच दुचाकी चालकाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या स्कॉर्पियो चालकाने उडविले होते. त्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. मागील महिन्यात पुन्हा भल्यापहाटे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिंद्रा गाडीच्या चालकाने एका रिक्षाला उडविले होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार