शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

वेळापत्रकाने पुणेकरांची झोप उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:05 IST

शहरामध्ये सोमवार (दि.२९) पासून पाणीकपात करणार आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने पाणीकपातीचे वेळापत्रक तयार केले आहे.

पुणे : शहरामध्ये सोमवार (दि.२९) पासून पाणीकपात करणार आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने पाणीकपातीचे वेळापत्रक तयार केले आहे. रात्री १२ ते पहाटे ४, मध्यरात्री २.३० ते पहाटे ६, दुपारी १ ते सायंकाळी ५ असे रात्रीचे व आॅफिसच्या वेळांचे भान न ठेवता वेळापत्रक तयार केले आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने शहराला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. आता दररोज केवळ ११५० एमएलडी पाणी शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी मिळणार आहे. त्यामुळे आता दोनवेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने एकच वेळ पाणीपुरवठा करणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.पाणीपुरवठा करताना नेहमीच अन्याय होणाºया बाणेर-बालेवाडी परिसर, सुसरोड, पाषाण लिंकरोड भागात मध्यरात्री अडीच ते पहाटे ४ या वेळेत, मेडिपॉइंट परिसर रात्री १२.३० ते १ वाजेपर्यंत, वारजे जुना जकात नाका परिसर, सहकारनगर पोलीस स्टेशन परिसर, गुरुराज गाडगीळ उद्यान परिसर रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत, भोसलेनगर रात्री १० ते पहाटे २, बाणेरगाव पहाटे ४ ते सकाळी ७ पर्यंत बोपोडी पहाटे ४ ते सकाळी ८.३० पर्यंत अशा प्रकारे रात्री-बेरात्री पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तयार केले आहे.अप्पर इंदिरानगर भागात दुपारी १२ ते सायंकाळी ४ पर्यंत, सकाळी १० ते ४ यावेळेत सहकारनगर परिसरात, गोखलेनगर, पांडवनगर परिसर सायंकाळी ४ ते रात्री ८, काकडे सिटी दुरारी १२ ते ४, रामनगर झोपडपट्टी दुपारी २.३० ते रात्री ९ अशा वेळांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे.।पाच तास पाणीपुरवठा काही भागासाठीचशहरामध्ये एकवेळच पाणीपुरवठा करणार असल्याने नागरिकांना पाणी भरण्यास पुरेसा वेळ मिळावा, यासाठी किमान पाच तास पाणी सोडण्याची मागणी पक्षनेत्यांनी केली होती. त्यानुसार महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रत्येक भागात किमान पाच तास पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; परंतु पाणीकपातीच्या वेळापत्रकामध्ये काही भागाला अर्धा तास, एक ते दीड तास, दोन तास, असा तर काही भागाला दिवसभर, सात तास, आठ तास, दहा ते बारा तास असा पुरवठा होणार असल्याचे वेळापत्रकावरून स्पष्ट झाले आहे.।पाणी वितरण व्यवस्थेत तांत्रिक अडचणीशहराची भौगोलिक रचना वेगळी असून, सध्या शहरात अस्तित्वात असलेली पाणी वितरण व्यवस्था अत्यंत जुनी आहे. लोकसंख्या विचारात घेता यावर अनेक मर्यादा येतात; उंचसखल भागामुळे पाण्याच्या वितरण व्यवस्थेत अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करताना वेळेचे नियोजन करताना २४ तासांचा विचार करून वितरण करावे लागते. - प्रवीण गेडाम,पाणी पुरवठा विभाग अधीक्षक अभियंता>सर्व पेठांमध्ये पहाटे५ ते १० वेळेत पाणीपुरवठासंपूर्ण शहरामध्ये पाणीकपात केली, तरी शहराच्या मध्यवस्तीमधील अनेक पेठांनापाणीकपातीचा फटका बसला नाही. शहराची भौगोलिक रचना व पाणीपुरवठ्यांच्या कालबाह्य ठरत असलेल्या पाणीपुरवठा वितरण यंत्रणेमुळे ही वेळ येत असल्याचे अधिकाºयांचे म्हणने आहे. यामुळे दिवसातून एकवेळ पहाटे ५ ते १० या वेळेत कमी-जास्त प्रमाणात पेठांमध्ये पाणीपुरवठा करणार आहे.>पाणीकपातीचे संकट; अधिकारी जपान दौºयावरसध्या ऐन दिवाळीत पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट आले आहे. पाणीकपातीतही योग्य पद्धतीने पाणीपुरवठा वितरणाच्या नियोजनाची गरज आहे; परंतु शहराच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी जपान येथे जायकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. पाणीपुरवठ्या संदर्भातील गंभीर तक्रारी दूर करण्यासाठी व्ही. जी. कुलकर्णी यांना तातडीने जपानहून बोलावून घ्या, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी यांनी केली आहे. गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठ्याबाबत गंभीर तक्रारी आहेत. अशावेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख जपान येथे जायकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. व्ही. जी. कुलकर्णी पाणीपुरवठा विभागाचे काम अनेक वर्षांपासू नबघत आहेत. त्यामुळेच त्यांना इत्यंभूत महिती आहे. यासाठी त्यांना तातडीने बोलावून घ्या, अशी मागणी उज्ज्वल यांनी महापौर मुक्त टिळक यांच्याकडे केली आहे.>पाणीकपातीनंतरही यापरिसरात दिवसभर पाणीपुरवठाकामगार पुतळा, गणेश खिंड रस्ता कोर्ट, सेंट्रलमॉलपर्यंत दोन्ही बाजू पुणे-मुंबई रस्ता, सीआयडी आॅफिस ते मरिआई गेटपर्यंत दोन्ही बाजूस पाणीकपातीनंतर देखील दोन्ही वेळ पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या वेळापत्रकावरून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Puneपुणे