शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

पांडुरंगाच्या पादुकांना नीरास्नान; पंढरपूरचा दिंडी सोहळा पुणे जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 18:29 IST

पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात मोठ्या भक्तिमय वातावरणात स्नान घालण्यात आले. सातारा जिल्ह्यातील मुक्काम आटोपून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. 

ठळक मुद्देयावर्षी सोहळ्यासोबत चालत आहेत रथाच्या पुढे १४ व रथामागे ८ दिंड्यासुमारे १५ हजार वारकरी सोहळ्यात सहभागी असल्याची सोहळाप्रमुख मयूर ननवरेंची माहिती

नीरा : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पादुका मागील चार वर्षांपासून आळंदीला जात आहेत. आज बुधवारी पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात मोठ्या भक्तिमय वातावरणात स्नान घालण्यात आले. सातारा जिल्ह्यातील मुक्काम आटोपून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. पंढरपूरच्या पांडुरंगाचे सेवेकरी कै. तात्यासाहेब वासकर यांनी संजीवन समाधीला पांडुरंगाच्या पादुका आळंदीला घेऊन जाण्याची मागणी केली होती. प्रत्यक्ष पांडुरंग समाधी सोहळ्यासाठी हजर असतात, अशी वारकर्‍यांची श्रद्धा आहे. वासकरांचे म्हणणे मागील काळात विठ्ठल मंदिर समितीने मान्य करून सोहळा सुरू केल्याचे विठ्ठलराव (दादासाहेब) वासकरमहाराज यांनी सांगितले. यावर्षी सोहळ्यासोबत रथाच्या पुढे १४ व रथामागे ८ दिंड्या चालत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, तसेच कर्नाटकातील वारकरी पांडुरंगाच्या वारीत सहभागी झाले आहेत. सुमारे पंधरा हजार वारकरी सोहळ्यात सहभागी असल्याची माहिती सोहळाप्रमुख मयूर ननवरे यांनी दिली.  कार्तिकी पौर्णिमेला पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपूर येथून निघाला आहे. अष्टमीला आळंदीला दाखल होणार आहे. सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथील मुक्काम आटोपून सकाळी लोणंद येथे न्याहरी घेऊन दुपारच्या विसाव्यासाठी नीरा नदीतील प्रसिद्ध दत्तघाटावर सकाळी अकरा वाजता दाखल झाला. या वेळी रथातील पालखी दत्त मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. पालखीतील पांडुरंगाच्या पादुकांना मोठ्या भक्तिमय वातावरणात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. दत्त मंदिराचे पुरोहित सचिन घोडके यांनी पादुकांचे स्वागत केले. दुपारच्या विसाव्यानंतर सोहळा पुणे जिल्ह्यातील वाल्मीक ऋषींच्या वाल्हे गावाकडे मार्गस्थ झाला. नीरेतील बाजारपेठेत पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणे