--
पुणे : जग झपाट्याने बदलले आहे, नव्या पिढीतील युवकांच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या आणि दु :खाची कारणे वेगळी आहेत, त्यामुळे चित्रकरांनी त्यांच्या कल्पनेतील चित्र साकारताना बदलत्या युगाचे विषय मांडावेत, असे प्रतिपदान ज्येष्ठ चित्रकार घनश्याम देशमुख यांनी केले.
सोलापूरातील ‘मॅड’ ॲकॅडमीच्या वतीने येथील राजा रवी वर्मा कलादालनात आयोजित ड्रीम्स क्रिएशन वर्ल्ड या तीन दिवशीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज घनश्याम देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमंगल शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक महेश देशमुख, आनंद मंत्री, उद्योजिका आंचल पाटील, ज्येष्ठ चित्रकार विनोद विर्णक , आयोजक आसावरी गांधी, डॅा. प्रियल दोशी, विकास गोसावी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, पेंटिंगच्या क्षेत्रात करिअर करणारी तरुण पिढी हुशार आहे, त्यांच्यावर जुन्या पिढीतील चित्रकारांचा मोठा प्रभाव आहे त्यांच्या प्रभावातून त्यांनी बरंच काही शिकाव मात्र त्यानंतर त्यांनी स्वत :ची वेगळी छाप पाडण्यासाठी वेगळी निर्मिती करावी तरच तुमची वेगळी ओळख निर्माण होईल व तुम्ही जागतिक दर्जाचे चित्रकार बनू शकाल.
प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. एकता कांबळे यांनी भरतनाट्यम नृत्यातून गणेशवंदना केली. मानव गायकवाड यांनी गणेशवंदन गीत गायले. सूत्रसंचालन प्रतीक जगदाळे आणि नम्रता जनगाटे यांनी केले.
--
पुण्याची शाब्बासकी प्रोत्साहन वाढविणारी
--
जगामध्ये कोणाकडूनही दाद मिळणे सोपे आहे. मात्र, पुणेकरांकडून दाद मिळण्याला मोठे महत्व आहे. तुमच्याकडे उत्तम दर्जा असेल तरच तुम्हाला येथे दाद मिळते. सोलापूरच्या कलावंत आणि आयोजकांनी पुण्यात येऊन प्रदर्शन भरविण्याचे धाडस केले आणि पुणेकरांनी त्याला आजपासूनच उत्तम प्रतिसाद देत त्यांचे कौतुक केले ही सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. पुणेकरांच्या प्रोत्साहनामुळे सोलापूरकर जागतिक दर्जाचे प्रदर्शन भरवू शकतील, असे प्रतिपादन महेश देशमुख यांनी केले.
---
फोटो २८ पुणे ड्रीम प्रदर्शन
फोटो ओळी : मॅड ॲकॅडमीच्या वतीने आयोजित ड्रीम क्रिएशन वर्ल्ड चे उद्घाटन करताना घनश्याम देशमुख, महेश देशमुख, आनंद मंत्री, आंचल पाटील, विनोद विर्णक , आसावरी गांधी, डॅा. प्रियल दोशी, विकास गोसावी