शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘पॅडमॅन’ अक्षयकुमार आज महिलांशी साधणार संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 06:37 IST

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार अतिशय हटके अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर जाण्यास सज्ज आहे. पॅडमॅन चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन करताना दिसणार आहे.

पुणे : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार अतिशय हटके अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर जाण्यास सज्ज आहे. पॅडमॅन चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन करताना दिसणार आहे. सध्या चाहत्यांना त्याच्या या चित्रपटाची प्रतीक्षा असून, अनेकांना चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. लोकमतने सखी मंच सभासदासाठी हा योग जुळून आणला असून, सोमवारी अक्षयकुमारसोबत त्यांना समोरासमोर संवाद साधता येणार आहे. या चित्रपटाचा ‘लोकमत’ मीडिया पार्टनर आहे.सोमवारी दुपारी २ वाजता गेनबा सोपानराव मोझे प्रशाला येथे अक्षय कुमार ‘पॅडमन’ या चित्रपटाबद्दल दिलखुलास संवाद साधणार आहे. या वेळी यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. उषा काकडे व रोझरी ग्रुप आॅफ एज्युकेशनचे संचालक विनय आºहाणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात उपस्थित सखींना त्यांच्या मनात असलेले सर्व प्रश्न अक्षयला विचारता येतील. या संवाद सत्रातून एका भाग्यवान विजेत्याला दस्तुरखुद्द अक्षयकुमारच्या हस्ते एक आकर्षक बक्षीसही जिंकण्याची संधी आहे. अक्षय नेहमीच त्याच्या चाहत्यांमध्ये रमणे पसंत करतो. जेव्हा तो चाहत्यांसोबत असतो, तेव्हा स्टारपण विसरून त्यांच्यात मिसळतो. असाच काहीसा अनुभव या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सखी मंच सभासदांनाही अक्षयला भेटण्याची आतुरता आहे. दरम्यान, अक्षयकुमारचा पॅडमॅन हा चित्रपट अरुणाचल मुरुगनाथम यांच्या संघर्षमय कथेवर आधारित आहे. दुर्गम भागातील महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.सुपर हीरो है ये पगला अशी टॅगलाइन असलेल्या या चित्रपटात अक्षयसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हीरो अशी ओळख असलेला अक्षय कुमार गेल्या काही वर्षांपासून सामाजिक विषयाला वाहिलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधत आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा पॅडमॅन हा चित्रपटदेखील याच पठडीतला आहे.वेळ : १५ जानेवारी २०१८ रोजीदुपारी २ वाजता.स्थळ : गेनबा सोपानराव मोझे प्रशाला, महाराष्ट: हाऊसिंग बोर्ड, येरवडा, पुणे ०६.सखी मंच सभासदांना ओळखपत्रावर प्रवेश तसेच महिलांसाठी खुला.

टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारLokmat Eventलोकमत इव्हेंट