शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
4
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
5
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
6
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
7
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
8
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
9
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
10
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
11
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
12
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
13
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
14
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
15
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
16
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
17
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
18
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
19
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
20
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

पादीरवाडी झाली टँकरमुक्त

By admin | Updated: January 26, 2016 01:41 IST

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जलयुक्त शिवार योजना व लोकसहभाग यांमुळे वडगाव आनंद येथील पादीरवाडी या अवर्षणप्रवण शिवारात जुन्या

आळेफाटा : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जलयुक्त शिवार योजना व लोकसहभाग यांमुळे वडगाव आनंद येथील पादीरवाडी या अवर्षणप्रवण शिवारात जुन्या ओढ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. या ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांत पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याचे पाणी जलवाहिनीद्वारे आणल्याने येथील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. यामुळे एके काळी अवर्षणप्रवण असणारी पादीरवाडी टँकरमुक्त झाली आहे. जवळपास १,८०० एकर जमीन सिंचनाखाली अली असून, या पाण्याच्या जोरावर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याकडे गावाची वाटचाल सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या एकात्मिक पाणलोट कार्यक्रमांतर्गत जुन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील अवर्षणप्रवण गावांचा समावेश करण्यात आला. याअंतर्गत विकासाच्या दृष्टीने मागासलेल्या, सतत उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट गडद होणाऱ्या व साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या पादीरवाडी या गावाची दोन वर्षांपूर्वी निवड करण्यात आली.पाणलोट समिती वडगाव आनंदच्या अध्यक्षा वैशाली देवकर, सदस्य डी. बी. वाळुंज, सचिव वैशाली देवकर, सुरेश शिंदे, नाथा पादीर यांनी पादीरवाडी ग्रामस्थांना या कार्यक्रमाची माहिती देऊन त्याचे महत्त्व पटविले. लोकवर्गणी प्रेरक प्रवेश उपक्रमांतर्गत पाणलोट निधी यांमुळे या परिसरातील बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. जलवाहिनीद्वारे कालव्यातील पाणी या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. या पाण्यामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. ही कामे करताना पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या समस्या वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी तसेच ही कामे मार्गी लागावीत, यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, लताताई चौगुले, उपसरपंच सिद्धार्थ गडगे, विघ्नहरचे माजी उपाध्यक्ष भीमाजी गडगे, सामाजिक कार्यकर्ते अनंत चौगुले, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मगर, तालुका कृषी अधिकारी हिरामणी शेवाळे, यांत्रिकी अभियंता कांबळे यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)जलयुक्त शिवार योजनेतही या परिसराचा समावेश करण्यात आला. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या भागातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला गती दिली. अवर्षणप्रवण परिस्थितीवर मात करण्यासाठी जुन्या ओढ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय झाला. तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांच्या मार्गदर्शनाखाली या कामांना उमेदीने सुरवात झाली. जलसंपदा विभागाची मशिनरी कृषी, महसूल व छोटे पाटबंधारे विभाग आणि लोकसहभाग यांतून पादीरवाडीच्या या ओढ्यांवर जवळपास ६० बंधारे निर्माण झाले. शेतकरी बचत गट, शेतकरी समूह यांच्या पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून आणण्यात आलेल्या जलवाहिनीद्वारे हे बंधारे भरण्यात आले.