शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पुणे महापालिकेने दळवी रुग्णालयात उभारावा 'ऑक्सिजन'निर्मिती प्रकल्प: भाजप नेत्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 8:30 PM

कोरोना संकट काळात ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा दगावू नये यासाठी पालिकेने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

पुणे: कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांच्या संख्येत भरच पडते आहे. याचवेळी शहरात  ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरु आहे. आता पुणे महापालिकेने दळवी हॉस्पिटल येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे, आणि पिंपरीतील जम्बो कोविड सेंटर, ससून तसेच खासगी हॉस्पिटमध्ये उपचारांसाठी बेड्स उपलब्ध होणे कठीण झाले आहे.तसेच रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा हळूहळू कमी पडू लागला आहे. पुण्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध यंत्रणा चोहोबाजूंनी प्रयत्नशील आहेत. ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा दगावू नये यासाठी पालिकेने पावले उचलण्याची गरज असल्याचे बिडकर यांनी स्पष्ट केले. 

पालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये १७० बेड्स आहेत. त्यापैकी १३० ऑक्सिजन बेड्स आहेत तर उर्वरित ४० सर्वसाधारण बेड्स आहेत. सद्यस्थितीला प्रतिदिन  २२०० किलो (१२ ते १५ ड्युरा सिलिंडर) या प्रमाणे येथे ऑक्सिजनचा वापर होतो. तसेच बॅक अप म्हणून १६ बाय १६ जंबो सिलिंडरची पर्यायी व्यवस्था येथे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिल्याचे बिडकर यांनी सांगितले. ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत असल्याने रुग्णांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी दळवी हॉस्पिटल येथे ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सभागृह नेते बिडकर यांनी केली. यासाठी लागणारा खर्च हा भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाच्या विकास निधीतून देण्याची तयारी असल्याचे बिडकर यांनी पालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

शहरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याने महापालिकेच्या दळवी रुग्णालयात प्रशासनाने ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्रकल्प उभारावा. यासाठी पालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व सभासदांच्या वार्डस्तरीय निधीतून प्रत्येकी दोन लाख २० रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी आहे असेही सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले...........'सेक्युरिस्क मल्टीपल सोल्युशन' या कंपनीने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव देखील या कंपनीने पालिका प्रशासनाकडे सादर केला आहे.  ८५९ लिटरचे दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारणे, बॅकअप साठी अतिरिक्त कॉम्प्रेसर तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेपर्यंत पाईपिंग, विद्युत तसेच इतर कामे करणे यासाठी दोन कोटी ३६ लाख २३ हजार १५२ रुपये खर्चाचा प्रस्ताव या कंपनीने पालिकेला दिला आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त