शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

मैदानी खेळ होतायेत काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:55 IST

उन्हाळ्याच्या सुटीत ग्रामीण आणि शहरी भागातील मुले मैदानी खेळाऐवजी टीव्ही, मोबाइल, व्हिडीओ गेम पाहण्यातच मग्न आहेत. त्यामुळे हे ग्रामीण बाज असलेले मैदानी खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेले ग्रामीण भागातील मैदानी खेळ आधुनिकीकरणामुळे व मोकळ्या मैदानअभावी लोप पावत चालले आहेत. या खेळांना ऊर्जितावस्था आणण्याची गरज आहे.

सासवड  -  उन्हाळ्याच्या सुटीत ग्रामीण आणि शहरी भागातील मुले मैदानी खेळाऐवजी टीव्ही, मोबाइल, व्हिडीओ गेम पाहण्यातच मग्न आहेत. त्यामुळे हे ग्रामीण बाज असलेले मैदानी खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेले ग्रामीण भागातील मैदानी खेळ आधुनिकीकरणामुळे व मोकळ्या मैदानअभावी लोप पावत चालले आहेत. या खेळांना ऊर्जितावस्था आणण्याची गरज आहे.पूर्वी मे महिन्यात उन्हाळ्याची सुटी लागली, की ग्रामीण भागात पूर्वी लहान मुले गोट्या, विटीदांडू, गलोरी, लगोरी, सूरपारंब्या, कुईकुई जामीन कोण, टायर फिरविणे, भवरा, आट्यापाट्या, लपाछपी, अबाधबी, आर मारणे हे मुलांचे खेळ, तर काचकवडी, जिबली, दोरीउड्या, लंगडी, चल्लस, मामाचं पत्र, खड्यांनी खेळणे हे मुलींचे खेळ पूर्वी खेळले जात होते.हे खेळ खेळत असताना दिवसभर परिसर मुलांच्या आवाजाने, दंग्याने गजबजून जात असे. या खेळामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढही होते आणि मुलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढते. या मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आजकाल पालकांनीच मोबाइलमधून बाहेर पडण्याची गरज आहे.मोबाइलवचर मुलं व्यस्तसध्या जग बदलत आहे. या बदलत्या काळाबरोबर खेळही बदलले आहेत. मुलांच्या हातात विटीदांडू, भवरा याऐवजी मोबाइल आला आहे. मुले मोबाइलवर गेम खेळण्यातच रमत आहेत.मोबाईलबरोबरच टीव्हीवरील कार्टून दिवसभर बघत बसणे, व्हिडीओ गेम यामुळे मुलांनी ग्रामीण खेळांकडे पाठ फिरविली आहे. पण या आधुनिक मोबाइल आणि टीव्हीमुळे मुलांमध्ये न्यूनगंडाचीभावना निर्माण होत आहे.मुले चिडचिडी बनत असून, त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. त्यामुळे मुलांनी आजही ग्रामीण खेळ खेळणे गरजेचे असल्याचे मत विवेकानंद ग्रुपचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संतोष गिरमे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Sportsक्रीडाPuneपुणे