शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

पुण्यात ८९ अनधिकृत रूफटॉप हॉटेलपैकी केवळ नऊ हॉटेलवर गुन्हा दाखल

By राजू हिंगे | Updated: May 21, 2024 14:22 IST

नऊ हॉटेलवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमच्या कलम ५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे...

पुणे : शहरातील ८९ अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सपैकी ७६ हॉटेलांना नोटिसा पाठविण्यात आल्या. त्यापैकी ५३ हॉटेलवर कारवाई केली गेली. सहा हॉटेल मालकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेतले आहे. सात हॉटेलचा वापर बंद झाला आहे. सात हॉटेल मालकांनी कारवाईला स्थगिती मिळविली आहे. नऊ हॉटेलवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमच्या कलम ५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहराच्या विविध भागात इमारतींच्या टेरेसवर, तसेच सामाईक जागेत शेड उभे करून हॉटेल व्यवसाय केला जात आहे. यामुळे या भागातील रस्त्यांवर पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो, तसेच रात्री उशिरापर्यंत हे हॉटेल सुरू राहतात, त्यामुळे या भागातील नागरिकांना त्याचा उपद्रव होतो. पार्किंग, ध्वनिप्रदूषण यासंदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येतात. याची दखल घेत महापालिकेने रूफटॉफ हॉटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती.

कल्याणीनगर येथील बॉलर पबसमोर बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने भरधाव कार चालवून धडक दिली. यात तरुणीसह दोघांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. महापालिकेनेही या अपघाताच्या निमित्ताने पब, हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांच्या दृष्टीने तपासणी करण्याचे आदेश दिले असून, बॉलर पबच्या पाहणीसाठी देखील पथक पाठविले होते.

टॅग्स :Puneपुणेhotelहॉटेल