शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा पैसे न देता वाहने पार्क करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:46 IST

कौटुंबिक न्यायालयातील पे अँड पार्क : वकील संघटनांचा विरोध

पुणे : कौटुंबिक न्यायालयातील वाहनतळासाठी करण्यात आलेला पे अ‍ॅण्ड पार्कचा निर्णय मागे न घेतल्यास १ नोव्हेंबरपासून वकील पैसे न देता वाहने पार्क करतील, असा इशारा फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशनने (एफसीएए) मंगळवारी दिला.पे अ‍ॅण्ड पार्कच्या निर्णयाचा असोसिएशनने निषेध केला. तर या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी पुणे बार असोसिएशनतर्फे (पीबीए) जिल्हास्तरीय सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असून त्याचे निवेदन उच्च न्यायालयाला देण्यात येणार आहे. पार्किंग मोफत ठेवायचे की त्यासाठी पैसे आकारायचे या मुद्द्यावरून तब्बल १४ महिन्यांपासून बंद असलेले कौटुंबिक न्यायालयातील दोन मजली वाहनतळ आता पे अ‍ॅन्ड पार्क तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी (११ आॅक्टोबर) घेण्यात आला. या निर्णयाला विरोध करण्यासाठी असोसिएशनतर्फे मंगळवारी कौटुंबिक न्यायालयातील वकिलांच्या बाररूममध्ये दुपारी सभा घेण्यात आली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. पीबीएचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार, एफसीएएचे अध्यक्ष अ‍ॅड. नियंता शहा, उपाध्यक्ष अ‍ॅड. अभय शिरसाट, अ‍ॅड. सुप्रिया कोठारी, अ‍ॅड. के. आर. शहा, अ‍ॅड. राणी कांबळे, अ‍ॅड. सुचित मुंदडा, अ‍ॅड. हेमंत झंजाड, अ‍ॅड. विवेक भरगुडे, अ‍ॅड. यशवंत खराडे, अ‍ॅड. विश्वजित पाटील, अ‍ॅड. शिरीष शिंदे आणि अ‍ॅड. संदीप फडके उपस्थित होते. एफसीएएने यापूर्वी २० वेळा पत्रव्यवहार करून आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र केवळ एकाच संघटनेची भूूमिका लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी मोफत पार्किंग द्यावे. त्यासाठी येणारा खर्च आमची संघटना करण्यास तयार आहे, अशी भूमिका आम्ही घेतली आहे.वकील संघटना पैसे कमविण्यासाठी नाहीपक्षकार आणि वकिलांवर अन्याय झाल्यास त्यांच्या बाजूने संघटनाने आवाज उठवावा. वकिलांच्या संघटना या पैसे कमविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. पुण्यातील न्यायालयात पे अ‍ॅन्ड पार्क सुरू केल्यास राज्यात इतर ठिकाणीही अशाच प्रकारे निर्णय लादले जातील. त्यामुळे येथील वकिलांनी विरोध केला नाही तर इतर ठिकाणी पैसे मोजावे लागतील, अशी भूमिका यावेळी वकिलांनी मांडली.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय