शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा शासनाचे ग्रंथमित्र पुरस्कार परत करणार; ग्रंथमित्रांचा इशारा, मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 14:55 IST

ग्रंथालय व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर, शासनाने उत्कृष्ट सेवेबद्दल प्रदान केलेले शासनाचे ग्रंथमित्र पुरस्कार परत करण्याचा इशारा राज्यातील ग्रंथमित्रांनी दिला आहे.

ठळक मुद्देज्ञानदानाचे कार्य ग्रंथालयातून, मात्र हीच ग्रंथालये आज उपेक्षित : राजकुमार हंचाटेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले मागण्यांचे व पुरस्कार परत करण्याबाबतचे पत्र

चाकण : ग्रंथालय व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर, शासनाने उत्कृष्ट सेवेबद्दल प्रदान केलेले शासनाचे ग्रंथमित्र पुरस्कार परत करण्याचा इशारा राज्यातील ग्रंथमित्रांनी दिला आहे. १७ फेब्रुवारीला सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी अधिवेशन सोलापूर येथे होणार आहे. सोलापूर कृती समितीने मागण्यांचे व पुरस्कार परत करण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.ज्ञानदानाचे सर्वात मोठे कार्य जर कुठे होत असेल तर ते म्हणजे ग्रंथालयातून. मात्र हीच ग्रंथालये आज उपेक्षित आहेत. सरकारने ग्रंथमित्र पुरस्कार देऊन काम करणाऱ्यांचा सन्मान केला, मात्र सन्मानाने पोट भरते का? असा सवाल सोलापूर येथे १७ फेब्रुवारीला होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय अधिवेशनाचे निमंत्रक राजकुमार हंचाटे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे केला.राज्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी. तोपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे देण्यात यावे. अनुदानात दुप्पट वाढ करावी, कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन मिळण्याची कार्यवाही व्हावी. नवीन मान्यता व वर्गवाढ त्वरित चालू करावी. सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेस शासकीय मान्यता मिळावी. कर्मचाऱ्यांचा सामुदायिक विमा उतरविण्याची कार्यवाही व्हावी. ग्रंथालयातील कर्मचारी यांच्या पदावरील व्यक्तीला मान्यता मिळण्याची कार्यवाही व्हावी. आदी मागण्या समितीने या पत्राद्वारे केल्या असल्याची माहिती खेड तालुक्यातील ग्रंथमित्र रमेश सुतार यांनी दिली.वेतनश्रेणी, अनुदान दुप्पट वाढ, ओळखपत्र, तपासणी कार्यक्रमाचा प्रश्न, प्रवास खर्च, नवीन मान्यता व वर्गवाढ, सामुदायिक विमा, अहवाल तपासणी प्रश्न, संघटनेस सरकारी मान्यता मिळावी आदी मागण्या सोलापूर अधिवेशन कृती समितीने सरकारला दिल्या असून याबाबत अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार आहे. यावेळी रवींद्र कामत, सुनील कुबल, रमेश जनबंधू, भीमाशंकर बिराजदार, नंदू बनसोडे, रमेश सुतार, बेडगनुर, गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :ChakanचाकणMumbaiमुंबईPuneपुणे