शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्ग जोडणार अन्य वाहतूक सुविधांना, आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकार करणार काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 04:27 IST

शिवाजीनगर ते स्वारगेट हा मेट्रोचा भुयारी मार्ग त्यावरील अन्य वाहतूक सुविधांना जोडण्याचा प्रयत्न महामेट्रो कंपनीच्या वतीने केला जाणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकारांची मदत घेण्यात येत आहे. तसेच मेट्रो स्थानकांमध्येही पुणे शहराचे वैशिष्ट्य आणण्यासाठी विशेष प्रयत्न केला जात आहेत.

पुणे : शिवाजीनगर ते स्वारगेट हा मेट्रोचा भुयारी मार्ग त्यावरील अन्य वाहतूक सुविधांना जोडण्याचा प्रयत्न महामेट्रो कंपनीच्या वतीने केला जाणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकारांची मदत घेण्यात येत आहे. तसेच मेट्रो स्थानकांमध्येही पुणे शहराचे वैशिष्ट्य आणण्यासाठी विशेष प्रयत्न केला जात आहेत.महामेट्रोच्या वतीने ही माहिती देण्यात आली. शिवाजीनगर ते स्वारगेट हा सुमारे ५ किलोमीटर अंतराचा मेट्रो मार्ग पूर्ण भूयारी आहे. जमिनीच्या तब्बल २५ मीटर खालून तो जाणार आहे. धावणाºया मेट्रोच्या वर किमान ६ मीटर अंतर असणार आहे. या भुयारी मार्गात ५ स्थानके असतील. तिथून प्रवाशांना वर येता यावे, आल्यानंतर लगेचच रस्त्यावरची वाहने उपलब्ध व्हावीत, त्यासाठी लांब अंतरावर चालत जावे लागू नये यासाठी महामेट्रो विशेष प्रयत्न करत आहे.यामध्ये शिवाजीनगर येथे रस्त्यावरून धावणाºया एसटी शहरातंर्गत धावणाºया पीएमपी, रेल्वे मार्ग, पीएमपीआरडीचा मेट्रोमार्ग एकमेकांना जोडणारआहे. न्यायालय परिसरातील रस्त्यावरच्या वाहन सुुविधाही अशाच मेट्रो मार्गाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती महामेट्रोने दिली.भुयारी मार्ग शहराच्या मध्यवस्तीतून जाणार असला तरीही तो जमिनीच्या किमान २८ मीटर खाली असेल. अत्याधुनिक यंत्रांच्या साह्याने हा बोगदा तयार केला जाणारआहे. त्यामुळे त्याच्या आसपासच्या वास्तू किंवा जमिनीतील जलवाहिन्या, विजेच्या किंवा दूरसंचारच्यातारा यांना काहीही धोका नाही, असे सांगण्यात आले.उन्नत मार्गावरची सर्व स्थानके विशिष्ट आकारचीमेट्रोबद्दल प्रवाशांना लांबूनही आकर्षण वाटले पाहिजे. त्यासाठी उन्नत मार्गावरची (रस्त्यावरच्या) सर्व स्थानके विशिष्ट आकार देऊनच बांधण्यात येतील. त्यासाठीही विशेष वास्तुरचनाकार प्रयत्न करीत आहेत. यात पगडी किंवा पुणे शहराची ओळख असलेले अन्य आकार कसे करता येतील याचा विचार होत आहे.काही आरेखने तयार असून ती तंत्रदृष्ट्या तपासून पाहण्यात येत आहेत. प्रवाशांना कसलाही त्रास होऊ नये, अशीच मेट्रोची व स्थानकांची रचना असणार आहे. सुलभ व सोप्या पद्धतीने मेट्रोकडे जाता यावे, तिथून येता यावे यासाठी खास प्रयत्न करण्यात येत आहेत, अशीमाहिती महामेट्रोने दिली.

टॅग्स :Metroमेट्रो