शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी चित्रपट जागतिक होण्यासाठी ऑस्करचे सहकार्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:39 IST

मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकारने पावली उचलली आहे...

ठळक मुद्देअकादमी प्रयत्न करणार : नवीन सरकारनंतर पहिली बैठक होणार

पुणे : मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकारने पावली उचलली असून, चित्रपटाच्या संवर्धनासाठी ऑस्कर अकादमीच्या सुविधा व योजना यांचा प्रभावीपणे वापर करून घेण्याकरिता राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने नवीन सरकार स्थापनेनंतरच या समितीची पहिली बैठक होईल. याचा अध्यादेश नुकताच काढला आहे. ऑस्कर अकादमीचे सदस्य डॉ. उज्ज्वल निरगुडकर यांना जगभरामध्ये सर्वाधिक मानाच्या समजला जाणाऱ्या ९१व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ऑस्कर अकादमीचा भारतीय चित्रपटांसह मराठी चित्रपटांना कशा पद्धतीने फायदा करून घेता येऊ शकतो, यादृष्टीने निरगुडकर सातत्याने प्रयत्न करीत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांनी मुंबईला भेट दिली आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली होती. मराठी चित्रपटांचे संवर्धन आणि  मराठी चित्रपट जगाच्या कानाकोपºयात पसरावा, यासाठी ऑस्कर अकादमी सहकार्य करण्यास तयार आहे. अकादमीच्या सुविधा व योजनांचा प्रभावीपणे वापर करून घेण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्याचा निर्णय भेटीदरम्यान घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष राज्याचे सांस्कृतिक मंत्री असतील. तर, सांस्कृतिक कार्याचे प्रधान सचिव हे सदस्य व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित हे सदस्य असतील. उज्ज्वल निरगुडकर यांचा तज्ज्ञ म्हणून समितीत समावेश आहे........

दादासाहेब फाळकेंचा पुतळा असेल.. ऑस्कर अकादमीचे विभागीय कार्यालय मुंबईत करण्यासाठी योजना व पाठपुरावा करणे. चित्रपट इतिहासावर आधारित आंतरराष्ट्रीय संग्रहालय बांधण्याचे काम अकादमीतर्फे लॉस एंजलीस (अमेरिका) येथे चालू आहे. 

भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रणेते दादासाहेब फाळके यांचा अर्धाकृती पुतळा या संग्रहालयात असावा, हे अकादमीने मान्य केले आहे. नवीन सरकार आल्यानंतर समितीची बैठक घेऊन कामाची आखणी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आले.

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाOscarऑस्करmarathiमराठी