शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Zika Virus In Pune: ‘झिका’ चे उगमस्थान सापडेना; संसर्गामुळे डॉक्टरांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 12:06 IST

Zika Virus In Pune - संसर्गाचे मूळ शाेधले गेले नाही, तर हा संसर्ग इतरांनाही होऊन त्याचे रुग्ण वाढू शकतात

पुणे : शहरात ‘झिका’ या विषाणूची लागण ४६ वर्षांच्या प्रॅक्टिसिंग डाॅक्टर आणि त्याच्या १५ वर्षांच्या मुलीला झाल्याचे आढळून आले. झिका (Zika Virus) हा प्रामुख्याने आफ्रिका आणि आग्नेय आशिया, अमेरिका व दक्षिण भारतात आढळताे. या डाॅक्टर व कुटुंबीयांनी या ठिकाणी किंवा दुसरीकडे प्रवास केला नव्हता. त्यामुळे त्यांना ‘झिका’ची लागण कशी झाली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

‘झिका’चा प्रसार एडिस इजिप्ती (Aedes Aegyptiडासांपासून माणसाला हाेताे. रुग्णांच्या लैंगिक संबंधातूनही त्याचा प्रसार हाेताे. याआधी पुण्यात जेव्हा-जेव्हा रुग्ण सापडले तेव्हा त्यांनी काेठे ना काेठे प्रवास केल्यामुळे किंवा संपर्कात आल्याने तेथे त्यांना लागण झाली होती. परंतु, आता सापडलेल्या रुग्णाच्या संसर्गाची साखळी मात्र आराेग्य यंत्रणेला सापडलेली नाही. संसर्गाचे मूळ शाेधले गेले नाही, तर हा संसर्ग इतरांनाही हाेऊ शकताे आणि त्याचे रुग्ण वाढू शकतात, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

काय आहे झिका?

झिका हा फ्लॅविव्हायरस वंशातील विषाणू आहे. युगांडाच्या (Uganda) झिका जंगलातून हा विषाणू प्रथम १९४७ मध्ये वेगळा करण्यात आला होता. त्यावरून त्याला ‘झिका’ हे नाव पडले आहे. सन १९५० च्या दशकापासून, आफ्रिकेपासून आशियापर्यंतच्या विषुववृत्तीय पट्ट्यात विषाणूचा प्रभाव आढळून येताे. २००७ ते २०१६ पर्यंत, हा विषाणू पूर्वेकडे, प्रशांत महासागर ओलांडून अमेरिकेपर्यंत पसरला.

लक्षणे काय?

याची लक्षणे डेंग्यूप्रमाणे असतात. त्यामध्ये ताप, अंगावर पुरळ उठणे, डाेळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा, डाेकेदुखी यांचा समावेश हाेताे. ही लक्षणे दोन ते सात दिवस राहतात. तसेच, सर्वसामान्य उपचार, विश्रांती हा यावर उपाय आहे. त्यामुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाण नगण्य आहे.

गर्भवतींना धाेका

प्रौढांमध्ये झिका संसर्ग झाला तरी त्याचा दुष्परिणाम हाेत नाही; परंतु, गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाला तर ताे संसर्ग त्यांच्या पाेटातील बाळापर्यंत पसरू शकतो. त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती, बाळाच्या डाेक्याचा घेर कमी हाेणे, मायक्रोसेफली, मेंदूतील गंभीर विकृती आणि इतर जन्मदोष होऊ शकतात.

आता आढळलेल्या रुग्णांचा संसर्गाचा साेर्स सापडलेला नाही. झिका हा तुरळक दिसणारा व काेविड किंवा स्वाइन फ्लूसारखा वेगाने पसरणारा नाही. रुग्णांच्या घरापासून आजूबाजूच्या १०० फुटांपर्यंत रुग्णांचे सर्वेक्षण करणे आणि डासांवर नियंत्रण ठेवले की ताे आटाेक्यात येताे. तशा उपाययाेजना केल्या आहेत. - डाॅ. राजेश दिघे, सहायक आराेग्याधिकारी, पुणे मनपा

टॅग्स :PuneपुणेZika Virusझिका वायरसHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलenvironmentपर्यावरण