पिंपरी : नवरात्रौनिमित्त लोकमत घेऊन येत आहे, आपल्या सर्वांकरिता खास नवरात्री विशेष लयभारी धम्माल गेम शो. महिलांना तसेच इतर सर्वांकरिता आपल्या सोसायटीचा नवरात्र महोत्सव आता लोकमतबरोबर साजरा करता येणार आहे. या आनंदपर्वावर सर्वांना सहभागी होता यावे, म्हणून लोकमत सखी मंच व कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री स्पेशल लयभारी धमाल गेम शोचे आयोजन दि. १३ आॅक्टोबर ते २१ आॅक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आम्ही आपल्या सोसायटीमध्ये येणार आहोत. या वेळी मनोरंजनात्मक व कौशल्यप्रधान खेळांच्या स्पर्धा आम्ही घेणार आहोत. यामध्ये एका मिनिटाच्या अवधीमध्ये खेळता येतील, असे काही खेळप्रकारांचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये महिला, वयोवृद्ध व बालचमू सहकुटुंब सहभागी होऊ शकतात. तसेच यामध्ये विजयी होणाऱ्या स्पर्धकांना सेंट्रल मॉल व गजाजनन फूड्स यांच्या वतीने बक्षिसे देण्यात येतील. शिवाय, या खेळादरम्यान दररोज ठरणाऱ्या काही भाग्यवंत सखींना कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्सच्या वतीने सोन्याची नथ लकी ड्रॉ पद्धतीने मिळविण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)
नवरात्री लय भारी धम्माल गेम शोचे आयोजन
By admin | Updated: October 12, 2015 00:59 IST