शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विभागप्रमुखांच्याही बदल्या, आयुक्त सौरभ राव यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 02:03 IST

आयुक्तांचा दणका : त्वरित कार्यभार घेण्याचा आदेश

पुणे : महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या विभागप्रमुखांच्याही बदल्या केल्या. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांच्यासह अन्य काही महत्त्वाच्या विभागप्रमुखांना त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या विभागातून दुसरीकडे हलवण्यात आले आहे. शुक्रवारी कार्यमुक्त होऊन लगेचच दुसऱ्या ठिकाणचा कार्यभार घेण्यास त्यांना बदलीच्या आदेशातच बजावण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे जगताप यांना आता उपायुक्त परिमंडळ क्रमांक ४ हे पद देण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर सहायक आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोळक यांच्याकडे स्थानिक संस्था कर व परिमंडळ क्रमांक ४ चा कार्यभार होता. स्थानिक संस्था कर कायम ठेवून परिमंडळ क्रमांक ४ मधून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तुषार दौंडकर यांच्याकडील आकाश चिन्ह विभागाचा अतिरिक्त कार्यभार विजय दहिभाते यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्याकडे परिमंडळ क्रमांक १चे उपायुक्त म्हणून कार्यभार आहे. तो सांभाळून त्यांनी या पदाचा कार्यभार पाहायचा आहे. त्यांच्याकडे पूर्वीही हा विभाग होता.

दौंडकर यांच्याकडेच क्रीडा विभागाचाही अतिरिक्त कार्यभार होता. तो उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनीही आपल्या मूळ पदाचा कार्यभार सांभाळून हा नवा कार्यभार पाहायचा आहे. स्थापत्य विभागातील अधीक्षक अभियंता मदन आढारी यांच्याकडील प्रकल्प क्रमांक २ चा कार्यभार बदलून त्यांना मलनि:सारण विभागाची देखभाल-दुरस्ती सोपविण्यात आली आहे. यापदावर कार्यरत असलेले हेमंत देवधर यांना पाणीपुरवठा विभागात बदलण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागातील जगदीश खानोरे यांना तिथून बदलून प्रकल्प क्रमांक २ ची जबाबदारी देण्यात आली आहे.पदाधिकाऱ्यांनीही केली होती तक्रारकाही विभागप्रमुखांबाबत पदाधिकाºयांची तक्रार होती. कामांना विलंब लावणे, पदाधिकाºयांचे सांगणे टाळणे यामुळे त्यांच्याबाबत पदाधिकाºयांमध्ये नाराजी होती.बदल्यांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. राव यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच विभागप्रमुखांसह कनिष्ठ अभियंत्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सर्वांना नव्या पदावर त्वरित रुजू होण्याचाआदेश देण्यात आला असून राजकीय दबाव किंवा अन्य मार्गाने बदली टाळण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबीही देण्यात आली आहे.

टॅग्स :saurabh raoसौरभ रावPuneपुणे