शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:49 IST

विक्रम कोकरे यांचे उपोषण मागे; जिल्हा परिषद अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी दिले नारळपाणी

सांगवी : पणदरे (ता. बारामती)चे ग्रामविकास अधिकारी संजय साळुंके यांना अखेर निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. या कारवाईनंतर विक्रम कोकरे यांनी पंचायत समितीसमोर सुरू केलेले अमरण उपोषण रविवारी (दि. १९) मागे घेतले.विक्रम कोकरे यांनी पणदरे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराबाबत ग्रामविकास अधिकाºयाविरोधात कारवाई होण्यासाठी गेले पाच दिवस पंचायत समितीसमोर आमरण उपोषण केले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांनी भेट दिली. विक्रम कोकरे यांच्या आमरण उपोषणाची दखल घेऊन ग्रामविकास अधिकाºयाला निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेकडून देण्यात आले. नियमाच्या बाहेर जाऊन पणदरे ग्रामपंचायतीला कर्मचारी कमी करून नवीन कामगार नियुक्त करणे, शववाहतूक गाडीत गैरव्यवहार करणे, नळ डिपोझीट नियमाप्रमाणे ताळमेळ न घेणे, गैरव्यवहार, भ्रष्टाचार, अफरातफर यात तफावत आढळून आल्याने ववरील कामात हलगर्जीपणा केल्याने साळुंके यांनानिलंबित करण्यात आले आहे.ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावीपणदरे ग्रामपंचायतीमध्ये अजूनही खूप भ्रष्टाचार उघडकीस यायचा बाकी असून माझी वारंवार बदनामी केल्या प्रकरणी साळुंके अब्रुनुकसानीचा दावा टाकणार असून ग्रामसेवक व संबंधित प्रशासन यांच्यावर वसूल पात्र व फौजदारी गुन्हे दाखल होऊन, राज्यपाल शासन परिपत्रक ४ जानेवरी २०१७ प्रमाणे ग्रामविकास अधिकाºयाला वाचवण्याचा प्रयत्न करून विलंब केल्याने गटविकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंग व निलंबन होईपर्यंत आता गप्प बसणार नाही.बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील भ्रष्टाचार उघडकीस आणणार आहे. यासाठी कोणाच्या दबावाला बळी न पडता ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार असल्याचे कोकरे यांनी सांगितले.गटविकास अधिकारी प्रमोद काळे व तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या दबावाला बळी पडून मला कोणत्याही सूचना न देता उपजिल्हा रुग्णालयात डॉ. उमेश नाईक यांनी पोलिसांच्या मदतीने बळजबरीने आणले. नाईक यांनी खोटा वैद्यकीय अहवाल देऊन लोकशाहीचा घात केला आहे. यामुळे डॉ. नाईक यांचे निलंबन करण्यात यावे, तसेच गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याविरोधात विभागीय आयुक्तांकडे आरोपपत्र दाखल करणार आहे. - विक्रम कोकरे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणे