शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाला कुणीच जुमानेना, एकच आदेश दीड वर्षात काढला ८ वेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:24 IST

अल्पसंख्याक शिक्षण संस्थांनी नियमानुसार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे का, याबाबत पटपडताळणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी आॅगस्ट २०१६ ते डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये ८ वेळा दिले आहेत.

पुणे : अल्पसंख्याक शिक्षण संस्थांनी नियमानुसार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे का, याबाबत पटपडताळणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी आॅगस्ट २०१६ ते डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये ८ वेळा दिले आहेत. तरीही २०० अल्पसंख्याक शाळांपैकी काही शाळांचा अपवाद वगळता बहुतांश सर्व शाळांनी केराची टोपली दाखविली आहे. यातून शिक्षण विभागाची हतबलताच उजेडात आली आहे.अल्पसंख्याक संस्थांनी त्यांच्या शाळांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र शासनाने घालून दिलेल्या या अटी व शर्तींचे पालन या शाळांकडून केले जात नसल्याची तक्रार मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिनकर टेमकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार टेमकर यांनी पुणे विभागातील अल्पसंख्याक शाळांची पटपडताळणी करून त्याचा अहवाल ३ आठवड्यात सादर करण्याचे आदेश ३० आॅगस्ट २०१६ रोजी सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षणप्रमुख आणि प्रशासन अधिकारी यांना दिले. त्यांच्या या आदेशाला कुणीच प्रतिसाद दिला नाही.टेमकर यांनी त्यानंतर पुन्हा ९ नोव्हेंबर २०१६ रोजी अल्पसंख्याक शाळांचा पटपडताळणी अहवाल सादर करा, असे आदेश काढले. त्यानंतर १७ नोव्हेंबर २०१६ रोजी टेमकर यांनी पुन्हा तोच आदेश शिक्षणाधिकारी, शिक्षणप्रमुख आणि प्रशासकीय अधिकाºयांसाठी काढला. त्यानंतरही त्याला कुणी जुमानले नाही. २२ नोव्हेंबर २०१६ रोजी टेमकर यांनी पुन्हा एकदा तो आदेश जारी केला. हाच आदेश तारीख बदलून पुन्हा काढण्याचा सिलसिला १६ जानेवारी २०१७, १ मार्च २०१७, ११ एप्रिल २०१७, २० मे २०१७, १ जुलै २०१७ असा सुरू राहिला. कल्पेश यादव यांनी टेमकर यांना पत्र दिले, की ते लगेच शिक्षणाधिकाºयांनी पटपडताळणी अहवाल द्यावास असा आदेश काढण्यात आला.पुणे विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणाºया टेमकर यांच्या आदेशाला खरंच शिक्षणाधिकारी मानत नाहीत की मागणी करणाºया संस्था, संघटनांच्या समाधानासाठी केवळ तोंडदेखले आदेश काढण्याची कारवाई केली जाते, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. शिक्षण उपसंचालकांकडून आदेश काढण्याच्या या पोरखेळाला वैतागून अखेर याविरोधात १२ जानेवारी रोजी दिनकर टेमकर यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे कल्पेश यादव यांनी सांगितले. याबाबत टेमकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.आरटीईअंतर्गतप्रवेश देण्यास नकारशहरात अल्पसंख्याक शिक्षण संस्था त्यांना घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करीत नाहीत. त्यामुळे या संस्थांना याबाबत समज दिली गेल्यास आरटीईअंतर्गत प्रवेश या शाळांकडून दिले जाऊ शकतील. त्यामुळे त्यांची पटपडताळणी करण्याची मागणी करण्याात येत आहे.

टॅग्स :Puneपुणे