शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरला व्याजासह पैसे देण्याचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 18:29 IST

वारजे येथील माटे दाम्पत्याने २०१२ मध्ये फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत ५ लाख रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली होती.

ठळक मुद्देग्राहक मंच : मुदतीत पैसे न दिल्यास १० टक्के व्याजास ग्राहक पात्र

पुणे : मुदत ठेवीच्या रक्कमेचा धनादेश न वटल्या प्रकरणी दोषी ठरलेल्या फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला पुणे जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला आहे. तक्रारदारांना ५ लाख रुपयांवरील रक्कमेच्या व्याजासह ७ लाख २६ हजार १०० रुपये तीस दिवसांत देण्याचे आदेश अनिल खडसे यांच्या अध्यक्षतेखालील क्षितिजा कुलकर्णी व संगीता देशमुख यांच्या मंचाने दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास तक्रारदार दहा टक्के दराने पैसे मागण्यास पात्र ठरतील, असेही आदेशात नमूद केले आहे. वारजे येथील वैशाली व रत्नाकर माटे या दाम्पत्याने उदय पाटणकर या ब्रोकरच्या (मध्यस्त) माध्यमातून २०१२मध्ये फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत ५ लाख रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली होती. या ठेवीची मुदत २०१५ मध्ये संपली. त्या पोटी फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरने माटे दाम्पत्याला ७,२६,१०० रुपये देणे अपेक्षित होते. माटे यांना सप्टेंबर २०१५ मध्ये दोन धनादेश देण्यात आले. मात्र, दोन्ही धनादेश वटले नाहीत. माटे यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये पुन्हा नव्याने दोन धनादेश दिले. मात्र ते भरू नयेत, अशी सूचना कंपनीने केली. तिसऱ्यांदा मे २०१६ मध्ये दोन धनादेश दिले गेले. मात्र तेही वटले नाहीत. त्यामुळे माटे यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली.या प्रकरणावर सुनावणी घेत ग्राहक मंचाने फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर व ब्रोकर पाटणकर यांना एक महिन्याच्या आत ५ लाख रुपये २०१२ पासून ८ टक्के व्याजदराने द्यावेत. तक्रारदारांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासापोटी ५० हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसCourtन्यायालय