शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पासधारकांच्या संपकाळातील  भरपाईचा आदेश राहिला कागदावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 18:48 IST

संपकाळात पासधारकांच्या बुडालेल्या चार दिवसांची भरपाई फेब्रुवारी महिन्यात करण्याचे एस. टी. महामंडळाने दिलेले आदेश कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे. अनेक पासधारकांपर्यंत याबाबतची माहितीच न पोहचल्याने भरपाईचा कालावधी उलटून गेला आहे.

ठळक मुद्देएस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पासधारकांना पास वापरता आला नाही.पासधारकांच्या मुदतवाढ परिपत्रकाबाबत प्रवाशांना अंधारात ठेवल्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पासधारकांच्या संपकाळातील  भरपाईचा आदेश राहिला कागदावर पुणे : संपकाळात पासधारकांच्या बुडालेल्या चार दिवसांची भरपाई फेब्रुवारी महिन्यात करण्याचे एस. टी. महामंडळाने दिलेले आदेश कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे. अनेक पासधारकांपर्यंत याबाबतची माहितीच न पोहचल्याने भरपाईचा कालावधी उलटून गेला आहे. प्रशासनाने लाखो पासधारकांना अंधारात ठेऊन फसवणुक केल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. मागील वर्षी ऐन दिवाळीत एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पासधारकांना चार दिवसांचा पास वापरता आला नाही. दि. १७ ते २० आॅक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत बस पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे आधीच पैसे देऊन मासिक किंवा त्रैमासिक पास घेतलेल्या प्रवाशांचे चार दिवसांचे पैसे वाया गेले होते. त्यामुळे संपकाळातील दिवसांची भरपाई मिळावी, यासाठी प्रवाशांकडून मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ही मागणी मान्य करीत एस.टी.च्या महाव्यवस्थापकांनी (वाहतुक) दि. ३० जानेवारी रोजी परिपत्रक काढून दि. २८ फेब्रुवारीपर्यंत कालावधीत पासचा कालावधी वाढवून देण्याचे आदेश दिले होते. यासाठीचे अधिकार विभागीय वाहतूक अधिकारी किंवा आगार व्यवस्थापकांना राहतील. ही मुदतवाढ सध्या काढलेल्या पासावरच असेल. हे पत्र सर्व संबंधित तसेच वाहकांच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही परिपत्रकात नमुद करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक प्रवाशांपर्यंत या मुदतवाढीबाबत माहितीच पोहचली नसल्याचे समोर आले आहे.  दररोज सासवड ते स्वारगेट एसटीने  प्रवास करणारे दत्तात्रय फडतरे हे याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिपत्रकाबाबत प्रवाशांना काहीच माहिती नाही. प्रवाशांना याबाबत अंधारात ठेवल्याने सवलत मिळू शकली नाही. याबाबतची माहिती पासधारकांना सहजपणे दिसेल, अशा ठिकाणी लावणे, वृत्तपत्रांमध्ये याबाबत प्रसिध्दी देणे, सोशल मीडियावर प्रसार करणे आवश्यक होते. मात्र, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे प्रशासनाने प्रवाशांना अंधारात ठेऊन फसवणुक केली आहे. आगार प्रमुखांना याबाबत विचारले असता त्यांनी कुणाचीही तक्रार न आल्याने हे परिपत्रक लावले नाही, असे सांगितले.--------------------------मुख्यमंत्र्यांकडे तक्रार परिपत्रकाबाबत प्रवाशांना अंधारात ठेवल्याबाबत दत्तात्रय फडतरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तसेच दि. २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत संपल्याने बहुतेकांना चार दिवसांची मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा हा कालावधी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. ------------

     

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSwargateस्वारगेट