शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

भीम अ‍ॅपला ५ हजार नुकसानभरपाई देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 20:41 IST

भीम अ‍ॅपद्वारे देशभरात एका खात्यावरुन दुसऱ्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातात. हे अ‍ॅप्लिकेशन मोबाइल बँकिंगवर आधारित आहे.

ठळक मुद्देग्राहक मंच : अ‍ॅपमधून पैसे वर्गकरुनही खात्यात रक्कम झाली नाही वर्ग इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम सर्व्हिस प्रोव्हायडर असून रिझर्व बँकेकडून त्यांना अधिकृत मान्यता

पुणे : भीम अ‍ॅपद्वारे कॉर्पोरेशन बँकेतून आयडीबीआय बँकेत दहा हजार रुपये वर्ग करुनही जमा न झाल्यामुळे ग्राहक मंचाकडे दावा दाखल केलेल्या तक्रारदाराला मंचाने दिलासा दिला. अ‍ॅपमधील त्रुटीमुळे रक्कम जमा झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवून तक्रारदाराला दहा हजार रुपये परत देण्याचा आदेश मंचाने दिला आहे. तसेच, नुकसान भरपाईपोटी ५ हजार आणि दाव्याच्या खर्चापोटी ३ हजार रुपये देण्यात यावे, असेही मंचाने स्पष्ट केले.  जिल्हा ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांनी हा निकाल दिला. छोटेलाल प्रसाद (रा. प्रीतम प्रकाश नगर, ता. शिरुर) यांनी मंचाकडे दावा दाखल केला होता. त्यांनी नोडल आॅफिसर, भीम अ‍ॅप, नॅशनल पेमेंट्स कॉपोर्रेशन आॅफ इंडिया, द कॅपिटल, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा, कॉपोर्रेशन बँक घोडनदी शाखा, शिरुर यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. भीम अ‍ॅपद्वारे देशभरात एका खात्यावरुन दुसऱ्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातात. हे अ‍ॅप्लिकेशन मोबाइल बँकिंगवर आधारित आहे. तक्रारदाराचे कॉपोर्रेशन बँकेत खाते होते. तक्रारदाराने या बँकेच्या शिरुरमधील खात्यातून दहा हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यात वर्ग केले. सात आॅगस्ट २०१७ रोजी त्यांनी हे पैसे वर्ग केले होते. तक्रारदाराला त्याबाबतची रिसीट भीम अ‍ॅप्लिकेशनद्वारे मिळाली होती. मात्र तक्रारदाराच्या लक्षात आले की, आयडीबीआय बँकेच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झालेले नाहीत. बँकेच्या खात्यातून दहा हजार रुपये काढण्यात आल्याचे दाखविण्यात येत असले तरी ती रक्कम दुसऱ्या खात्यात जमा झालेली नव्हती.  चौकशी केल्यावर आयडीबीआय बँकेने तक्रारदाराला एसएमएस पाठविला. तक्रारदाराच्या खात्यासाठी त्या बँकेत युपीआय सर्व्हिसची (युनिफाइड पेमेंट सर्व्हिस)परवानगी देण्यात आलेली नाही, असे आयडीबीआय बँकेने कळविले. त्यानंतर तक्रारदार परत कॉपोर्रेशन बँकेकडे गेले. त्यांना पाठविण्यात आलेल्या एसएमएस मध्ये दहा हजार रुपये तक्रारदाराच्या एसबीआय बँकेच्या खात्यात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.मात्र, त्यांच्या एसबीआयच्या खात्या दहा हजार रुपये जमा झाल्याची नोंदच नव्हती. याप्रकरणी कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे तक्रारदाराने नोटीस पाठविली. भीम अ‍ॅपच्या नोडल आॅफिसरतर्फे सादर केलेल्या लेखी जबाबात तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नसल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम सर्व्हिस प्रोव्हायडर असून रिझर्व बँकेकडून त्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.  तक्रारदाराने युपीआयडी आॅप्शन वापरण्याऐवजी मोबाइल नंबर किंवा खाते क्रमांक एसबीआयला जोडला होता. त्यानंतर त्यावर पैसे जमा केले. तक्रारदाराने एसबीआय बँकेचा पर्याय निवडला म्हणून त्यावर पैसे जमा झाले. भीम अ‍ॅप त्याला जबाबदार नाही, असे उत्तर दिले.भीम अ‍ॅप हे सर्व्हिस देणारे आहेत, हे त्यांनी लेखी जबाबात मान्य केले. त्यामुळे तक्रारदार हे त्यांचे ग्राहक होतात. रक्कम कोठे गेली हे सांगण्यातच आले नाही. यावरुन लक्षात येते की या अ‍ॅपमध्ये त्रुटी आहेत. तक्रारदाराच्या कॉर्पोरेशन बँकेतून दहा हजार रुपये वजा करण्यात आले. मात्र, ते इतर कोणत्याही बँकेत जमा करण्यात आले नाही, ही त्रुटीच आहे. त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र असल्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला. 

टॅग्स :Puneपुणेbankबँक