शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी दांभिकता थांबवावी : मेधा कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:09 IST

अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असा एक खोटा आरोप भाजपा सरकारवर केला जातो.

पुणे - अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असा एक खोटा आरोप भाजपा सरकारवर केला जातो. मात्र, १९७५मध्ये आणीबाणी लादून आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणत्या आणि कोणाच्या सरकारने केला होता, याचे आत्मपरीक्षण करून ही दांभिकता थांबवावी, अशा शब्दांत आमदार मेधा कुलकर्णी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.कविता रसिक मंडळीतर्फे ‘एका संघर्षाची यशोगाथा’ या कार्यक्रमात आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. भूषण कटककर आणि ज्येष्ठ कवयित्री मृणालिनी कानिटकर-जोशी व भूषण कटककर यांनी ही मुलाखत घेतली.कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘मोदी सरकारने सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून पावले उचलली. मात्र, यामुळे काळ्या पैशांवर भिस्त असलेल्या लोकांच्या शेपटीवर पाय ठेवला गेला. आजही नोटाबंदीमुळे अडचणीत आलेले राजकारणातील मातब्बर नोटाबंदीविरोधात शंखनाद करीत आहेत.’’ वर्षा हळबे यांना आॅनलाईन काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी स्त्री संघर्षाविषयीचा लेखाजोखा मांडला.वर्षा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. चिन्मयी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया जाधव यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणे