शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

संमेलनाच्या सरकारीकरणाला विरोध, साहित्य संस्थांची भूमिका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 04:45 IST

‘आगामी साहित्य संमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आयोजित करण्यात यावे, शासन संमेलनाची पूर्ण जबाबदारी उचलेल,’ असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले होते; मात्र साहित्यिकांसह साहित्य संस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे  - ‘आगामी साहित्य संमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आयोजित करण्यात यावे, शासन संमेलनाची पूर्ण जबाबदारी उचलेल,’ असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले होते; मात्र साहित्यिकांसह साहित्य संस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संमेलनाचे सरकारीकरण नकोच, अशी परखड भूमिका संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली आहे. संमेलनांमध्ये राजकीय लोकांचा वाढत हस्तक्षेप, उद्घाटन आणि समारोपप्रसंगी व्यासपीठावर राजकारण्यांची होणारी गर्दी हा कायमच वादाचा विषय ठरतो. त्यातच संपूर्ण संमेलन सरकारच्या हातात गेले तर त्याचे स्वरूपच बदलेल, अशी भीतीही व्यक्तकरण्यात आली.अद्याप भिलारचे पत्र आले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सात निमंत्रणे आली आहेत. पुस्तकांच्या गावात संमेलन झाल्यास संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले होते. संमेलनाचे अनुदान २५ ऐवजी ५० लाख रुपये करण्याचा निर्णय सकारात्मक आहेच: संमेलन ताकदीने उभे करण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिला आहे; मात्र साहित्य संमेलनाच्या आयोजनात सरकारचा हस्तक्षेप नको, यावरही आपण ठाम असल्याचे प्रतिनिधींनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.आयोजक संस्थाकडून येणारे प्रस्ताव, संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक यातून साहित्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका सारखे राजकारण दर वर्षी रंगते. शासनाकडे संमेलन गेल्यास आगीत तेल ओतल्यासारखी स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता एका साहित्य संस्थेच्या प्रतिनिधीने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. शासनाच्या आणि पयार्याने मंत्र्यांच्या जवळ असणाºया साहित्यिकांची वर्णी लागण्याची शक्यताही या वेळी साहित्य वतुर्ळातून व्यक्त करण्यातयेत आहे.तावडे यांनी पुढील संमेलन भिलारला व्हावे, शासन संपूर्ण व्यवस्था करेल असे सांगितले; मात्र संमेलनावर सरकारचा वरचष्मा नको, असेच अनेकांचे म्हणणे आहे. मसापच्या शाहूपुरी शाखेने बºयाचदा संमेलनाच्या नियोजनाचा प्रस्ताव पाठवला आहे. तेथील प्रतिनिधींना शासनाने विचारणा करायला हवी. संमेलन अधिकाधिक उंचीवर नेण्यासाठी शासनाने मदत जरूर करावी; मात्र त्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नको.- मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसापशासन दरबारी चालणारी प्रक्रिया अत्यंत संथ आणि क्लिष्ट असते. कोणताही प्रस्ताव अथवा निवेदन दिल्यावरही त्यावर कार्यवाही करण्यास अनेक वर्षे लागतात. संमेलनाचे सरकारीकारण झाल्यास दर वर्षी संमेलन होईल की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त करण्यात आली.तावडे यांनी भिलारला संमेलन व्हावे, अशी इच्छा प्रकट केली असली, तरी महामंडळाला प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया त्यांना पार पाडावी लागेल. एखाद्या संस्थेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवावा लागेल.- डॉ. श्रीपाद जोशी,अध्यक्ष, साहित्य महामंडळ

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र