शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

युवकांना आॅस्कर ‘इंटर्न’ची संधी - डॉ. उज्ज्वल निरगुडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:43 IST

भारतीय चित्रपट ‘आॅस्कर’साठी पाठविणे किंवा त्याला आॅस्कर मिळणे इथपर्यंतच भारतीयांच्या ‘आॅस्कर’कडे पाहण्याच्या कक्षा सीमित आहेत; पण आॅस्कर अकादमी आणि भारतीय चित्रपटांचे आदानप्रदान कसे होईल, अशा व्यापक विचारामधून या कक्षा अधिकाधिक विस्तारित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.

- नम्रता फडणीसपुणे : भारतीय चित्रपट ‘आॅस्कर’साठी पाठविणे किंवा त्याला आॅस्कर मिळणे इथपर्यंतच भारतीयांच्या ‘आॅस्कर’कडे पाहण्याच्या कक्षा सीमित आहेत; पण आॅस्कर अकादमी आणि भारतीय चित्रपटांचे आदानप्रदान कसे होईल, अशा व्यापक विचारामधून या कक्षा अधिकाधिक विस्तारित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आगामी वर्षात भारतीय युवकांना आॅस्कर अकादमीच्या ‘इंटर्नशीप’ उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकणार आहे.आॅस्कर अकादमीचे सदस्य आणि ‘एसएमपीटीई’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या भारतीय विभागाचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांनी केलेल्या या सूचनेला अकादमीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.डॉ. उज्ज्वल निरगुडकर यांची आॅस्कर अकादमीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर, त्यांनी प्रथमच अमेरिकेतील लॉस एंजिलिस मधल्या आॅस्कर अकादमीला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आॅस्कर अकादमीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉन हडसन यांच्याशी तब्बल दीड तास संवाद साधून आॅस्कर आणि भारतीय चित्रपटांची नाळ कशी जोडता येईल, भारतात कोणते प्रकल्प आणणे शक्य होईल? याविषयी चर्चा केली.यावेळी आॅस्कर अकादमीच्या ‘इंटर्नशीप’ उपक्रमामध्ये भारतीय तरुणांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने प्राथमिक बोलणी झाली असून, त्याला डॉन हडसनयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अभिनय, दिग्दर्शन अशा चित्रपट क्षेत्राशी संबंधित विभागातील निवड झालेल्या तरुणांना अकादमीमध्ये तीन महिने प्रशिक्षण मिळेल. तसेच, हॉलिवूडच्या चित्रपटनिर्मिती कंपनीमध्ये सहा महिने काम करता येईल. याचबरोबर आॅस्करविजेत्या दिग्दर्शक, कलाकारमंडळींचे त्यांना मार्गदर्शन मिळेल, असे त्यांनी सांगितले.आॅस्कर अकादमीही महत्त्वाचीजगभरातील चित्रपटांसाठी ‘आॅस्कर’ हा एक प्रतिष्ठित अवॉर्ड असतो. यंदाच्या वर्षी जर आपल्या भारतीय चित्रपटाला आॅस्कर मिळाला नाही, तर पुढच्या वर्षी तरी मिळेल याची वाट पाहायची इतकीच काय ती ‘आॅस्कर’ बद्दलची भारतीयांची धारणा आहे; पण आॅस्कर पुरस्काराव्यतिरिक्तही आॅस्कर अकादमी अनेक उपक्रम राबविते. ज्याची भारतीयांना माहितीच नाही.त्यामध्ये स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल, निकोल फिल्म राइटिंग कॉम्पिटिशन, अकॅडमी गोल्ड इंटर्नशीप प्रोग्रॅम यांचा समावेश आहे. या उपक्रमांमध्ये भारताचा सहभाग कसा वाढवता येईल, यावर चर्चा झाली. अकादमीचा ‘इंटर्नशीप’ हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आत्तापर्यंत अमेरिकेतल्या ७० तरुणांची या इंटर्नशीपसाठी ते निवड करीत होते.या उपक्रमात भारतातील तरुणांनाही सहभागी करून घ्यावे, अशी एक सूचना मी हडसन यांना केली आणि त्याबाबत अकादमी तयार झाली आहे. पुढील वर्षापासून भारतीय तरुणांना ही संधी मिळू शकणार आहे.

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाOscarऑस्कर