शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून ‘वॉलेट’द्वारे रोजगाराची संधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 13:59 IST

शहरी व ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिकांना सुद्धा या वॉलेटच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळविता येणार आहे.

ठळक मुद्देवॉलेटद्वारे वीजबिल भरल्यास ५ रुपये कमिशन : अतिरिक्त उत्पन्न मिळणारसंबंधित उपविभाग कार्यालयाकडून अर्जदारांच्या अर्जांची व जागेची पडताळणीवॉलेटधारकाने प्रथम कमीतकमी ५ हजार रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यकवीजबिलांचा भरणा केल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या संबंधीत मोबाईल क्रमांकावर एसएमएस

बारामती : महावितरणने वीजबिल भरण्याच्या वॉलेटद्वारे रोजगाराची संधी निर्माण केली असून वॉलेटद्वारे वीजबिलांचा भरणा केल्यास प्रती पावतीमागे ५ रुपये कमिशन देण्यात येणार आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिकांना सुद्धा या वॉलेटच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळविता येणार आहे.दरम्यान बारामती परिमंडल अंतर्गत सोलापूर, सातारा जिल्ह्यात व बारामती मंडलमधील बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, शिरूर, भोर तालुक्यात ठिकठिकाणी महावितरणच्या वॉलेट नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महावितरणकडून वीजबिलांचा भरणा करण्यासाठी मोबाइल अ‍ॅपसह ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतर रोजगाराची नवी संधी निर्माण करीत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने स्वत:चे पेमेंट वॉलेट आणले आहे. वॉलेटद्वारे वीजग्राहकांना स्वत:चे वीजबिल भरता येईल. त्याचप्रमाणे बचत गट, जनरल स्टोअर्स, मेडिकल दुकानदार, किराणा दुकान आदी छोटे-मोठे व्यावसायिक, बचतगट, महावितरणचे वीजबिल वाटप व रीडिंग घेणाऱ्या संस्थांना या वॉलेटद्वारे ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करून उत्पन्न मिळविता येणार आहे. वॉलेट नोंदणीसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहे. 

त्यानंतर संबंधित उपविभाग कार्यालयाकडून अर्जदारांच्या अर्जांची व जागेची पडताळणी करण्यात येईल. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. वॉलेटधारकाने प्रथम कमीतकमी ५ हजार रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर १ हजार  रुपयांच्या पटीत रिचार्ज वाढविता येईल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबॅकिंगद्वारे रिचार्जची सोय उपलब्ध आहे. वॉलेट रिचार्ज केल्यानंतर वॉलेट अ‍ॅपद्वारे महावितरणच्या वीजग्राहकांकडून वीजबिलांची वसुली करता येईल. वीजबिलांचा भरणा केल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या संबंधीत मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठविला जाईल. विशेष म्हणजे एका वॉलेटमधील शिल्लक रक्कम वापरून सबवॉलेटद्वारे एकापेक्षा अधिक व्यक्ती ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करू शकणार आहेत.  .............महावितरण वॉलेटमधून ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करून कमिशनच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.शहरी व ग्रामीण भागातील इच्छुकांनी त्वरित महावितरणच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन अर्जाद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Baramatiबारामतीmahavitaranमहावितरण