शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

काँग्रेसच्या प्रदेश समितीवर अरविंद शिंदे, आबा बागूल, निता रजपूत यांना संधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 14:54 IST

काँग्रेसच्या प्रदेश समितीवर पुण्यातून पाठविल्या जाणा-या 12 सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

पुणे : काँग्रेसच्या प्रदेश समितीवर पुण्यातून पाठविल्या जाणा-या 12 सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, सात वेळा पालिकेवर निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल तसेच निता रजपूत यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार दीप्ती चौधरी यांना यातून वगळण्यात आले आहे तर उर्वरित 9 सदस्य पूर्वीपासून कार्यकारिणीवर आहेत.   काँग्रेसचे शहरात १२ ब्लॉक आहेत. त्यातून त्या प्रत्येक ब्लॉकमधून प्रदेश समितीवर प्रत्येकी एक प्रतिनिधी पाठविला जातो. त्या प्रतिनिधींची नावे व ब्लॉक पुढीलप्रमाणे. १ उल्हास पवार (पर्वती), २ अभय छाजेड (मार्केटयार्ड), ३- मोहन जोशी (नेहरू स्टेडियम) ४- बाळासाहेब शिवरकर (हडपसर), ५-शरद रणपिसे (रेल्वे स्टेशन), ६- अरविंद शिंदे (वडगाव शेरी), ७- विश्वजीत कदम (कोथरूड), ८ - रोहित टिळक (कसबा पेठ), ९ - रशीद शेख (कँटोन्मेंट), १० - नीता रजपूत (भवानी पेठ), ११ - कमल व्यवहारे (शिवाजीनगर), १२- आबा बागूल (बोपोडी)गेल्या अनेक वर्षांपासून प्रदेश समितीवर असलेल्या उल्हास पवार, मोहन जोशी, शरद रणपिसे, अभय छाजेड यांनाच पुन्हा संधी देऊन नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना डावलले गेल्याने पक्षात नाराजीची भावना आहे.

प्रदेश प्रतिनिधित्वावरूनही शहर काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदीप्रदेशवर पाठवण्याच्या प्रतिनिधींवरून शहर काँग्रेसमध्ये असंतुष्टांचा वणवा पेटला आहे. निष्ठावंतांना डावलून नेत्यांच्या पुढे पुढे करणा-यांना व पक्षाच्या शहरातील -हासाला जबाबदार असणा-यांना संधी दिल्याची टीका होत आहे. आबा बागूल, निता रजपूत यांना नव्याने घेण्यात आले असल्याचे समजते. तसेच महिलेशी असभ्य वागणूक केल्याप्रकरणी जामिनावर असलेल्यांनाही सामावून घेण्यात आले आहे. आमदार अनंत गाडगीळ यांना तसेच आणखी काही निष्ठावंतांना डावलण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस