शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

पुणे नाट्यसत्ताक महोत्सवातून ‘दर्दी’ नाट्यरसिकांना सर्वोत्तम नाटके पाहण्याची मिळणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 12:37 IST

वाईड विंग्ज मीडियाच्या वतीने दि. १२ ते १४ आणि दि. १९ ते २१ जानेवारी अशा दोन टप्प्यांत पुणे नाट्यसत्ताक महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे यंदाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

ठळक मुद्देया महोत्सवात २७ संस्थांची २९ सादरीकरणे ५ नाट्यगृहात होणारवाईड विंग्ज मीडियाच्या वतीने दि. १२ ते १४, दि. १९ ते २१ जानेवारी अशा २ टप्प्यांत महोत्सव

पुणे : पुण्यातील ‘दर्दी’ नाट्यरसिकांना एकाच छताखाली सर्वोत्तम नाटके पाहण्याची संधी मिळणार आहे, ती पुणे नाट्यसत्ताक महोत्सवाच्या माध्यमातून. वाईड विंग्ज मीडियाच्या वतीने दि. १२ ते १४ आणि दि. १९ ते २१ जानेवारी अशा दोन टप्प्यांत हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे यंदाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. ‘नाट्यसत्ताक रजनी’  हा संपूर्ण रात्रभर चालणारा पुण्यातील पहिलावहिला नाटकांचा जागर हे महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा नाट्यसत्ताक रजनीचा कार्यक्रम दि. २५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता सुरू होऊन दि. २६ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता संपेल.या महोत्सवात २७ संस्थांची  २९ सादरीकरणे ५ नाट्यगृहात होणार आहेत. त्यामध्ये सुदर्शन रंगमंच, ज्योत्स्ना भोळे सभागृह, भरत नाट्य मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व बालगंधर्व रंगमंदिर यांचा समावेश आहे.  ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप वैद्य यांचे दोन अंकी नाटक काजव्यांचा गावच्या सादरीकरणाने महोत्सवाची सुरुवात होईल, तर निरंजन पेडणेकर या तरुण प्रयोगशील रंगकर्मीच्या बेंगाल टायगर एट बगदाद झू या नाटकाने महोत्सवाचा दि. २१ जानेवारीला समारोप होईल. या दोन्ही नाटकांचे हे शुभारंभाचे प्रयोग असणार आहेत. या नाटकांसोबतच मोहित टाकळकर दिग्दर्शित आसक्त या संस्थेचे गजब कहानी हे हिंदीतील नाटकदेखील महोत्सवात सादर होणार आहे. विनोदोत्तम करंडक विजेत्या एकांकिका चि. श्री व सौ साखरे आणि सिल्ड तसेच, राज्यातील एकमेव माईम प्लेची स्पर्धा असलेल्या मौनांतर करंडक स्पर्धेतील विजेते एमआयटी कॉलेजचे वॉर एण्ड पीस व थिएट्रॉन एंटरटेनमेंटचे सो वॉट या एकांकिका देखील महोत्सवात सादर केल्या जाणार आहेत.  अश्विनी गिरी यांचे सोलो सादरीकरण असलेले वेणूनाद  हे नाटक व अरुंधती पटवर्धन यांचे तुका म्हणे हे नृत्याधारीत सादरीकरण पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.पुरुषोत्तम करंडकासह रोटरी करंडक, भरत करंडक या इतरही स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळविलेली बीएमसीसी कॉलेजची सॉरी परांजपे ही एकांकिका या महोत्सवाची रंगत आणखीनच वाढविणार आहे. हिंदी रंगभूमीवरील स्वतंत्र व नाट्यजंक्शन या दोन संस्था अनुक्रमे ‘जिसे लाहोर न देख्या वो जम्या नही’ व ‘नवाब की अकल गधों की शकल’ ही दोन नाटके सादर करतील. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे ‘भूमिका’ व ब्लिंकिंग स्पॉट प्रॉडक्शनचे ‘आता काय करायचं राव’ ही दोन नाटकेसुद्धा महोत्सवात सादर केली जाणार आहेत. राज्य नाट्य स्पर्धेतील पुरस्कारविजेती ‘द गिफ्ट’ व ‘कुलकर्णी आणि कंपनी’ ही दोन नाटके महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहेत. व्होडाफोन रंगसंगीत स्पर्धेतील पुरस्कारविजेती कोलाज क्रिएशन्सची एकांकिका फॅन्टम  महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सांगीतिकसूर छेडणार आहे. सलग दोन वर्षे पुण्यातील दाजीकाका गाडगीळ करंडक मारणारी औरंगाबादची संस्था नाट्यवाडा पाझर व मॅट्रिक या त्यांच्या दोन्ही करंडक विजेत्या एकांकिका ते महोत्सवात सादर करतील.

टॅग्स :PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर