शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील माेकळ्या खाणी ठरतायेत धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 16:51 IST

पुण्यातल्या विविध भागात माेकळ्या खाणी असून या खाणींमध्ये अनेक तरुण पाेहण्यासाठी उतरत असतात. खाेलीचा अंदाज न अाल्याने या खाणींमध्ये बुडून काहींचा मृत्यू झाला अाहे. त्यामुळे या खाणींच्या बाजूला संरक्षक भिंती उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.

पुणे : शहरात विविध ठिकाणी असललेल्या माेकळ्या खाणींमध्ये पाेहायला तरुण मंडळी जात असतात. या खाणी बऱ्याच खाेल असून अाकाराने माेठ्या अाहेत. अनेकदा या खाणींमध्ये पाेहताना खाेलीचा अंदाज न अाल्याने तसेच पाेहताना धाप लागल्याने तरुणांचा मृत्यू झाल्याचे समाेर अाले अाहे. काही दिवसांपूर्वीच कलवड भागातील एका खाणीमध्ये पाेहताना एका तरुणाचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे या माेकळ्या खाणी धाेकादायक ठरत असून त्यांच्या बाजूने संरक्षण भिंत बांधण्याची मागणी अाता करण्यात येत अाहे.     पुण्यातील लाेहगाव, विश्रांतवाडी तसेच वारजे भागात पाण्याच्या खाणी अाहेत. फार पूर्वी या खाणी दगड मिळविण्यासाठी खाेदण्यात अाल्या हाेत्या. कालांतराणे या खाणींमध्ये पावसाचे पाणी तसेच भूजलाचे पाणी साठून एकप्रकारे तळे तयार झाले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या खाणींमध्ये अनेक तरुण पाेहण्यासाठी उतरत असतात. अनेकदा खाेलीचा अंदाज न अाल्याने तसेच पाेहताना धाप लागल्याने काहींचा मृत्यूही या ठिकाणी झाला अाहे. तसेच लाेहगाव व विश्रांतवाडी येथील या माेकळ्या खाणींमध्ये अनेकांनी अात्महत्या सुद्धा केल्या अाहेत. या खाणींच्या जवळ लाेकवस्ती असल्याने नागरिकांच्या खासकरुन लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला अाहे. कलवड येथील एका खाणीच्या मुख्य रस्त्याच्या बाजूने भिंत बांधली असली तरी लाेकवस्तीकडून खाणीकडे जाणाऱ्या भागात कुठलेही कुंपन नसल्याने काेणीही सहज या खाणींजवळ जाऊ शकते. त्याचबराेबर रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधार असल्याने नागरिकांच्या जीवाला धाेका निर्माण हाेऊ शकताे.      काही ठिकाणी या खाणींचा वापर हा कचरा टाकण्यासाठी करण्यात येत असल्याचे ही दिसून येत अाहे. त्यामुळे या खाणींमध्ये कचऱ्याची बेटे तयार झाली असून जवळील नागरिकांचे अाराेग्य धाेक्यात अाले अाहे. पालिकेकडून विश्रांतवाडी येथील खाणीमध्ये वाॅटर स्पाेर्टस करण्याचा प्रस्ताव अाणला हाेता. मात्र त्याला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे या खाणींच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी नागरिक अाता करीत अाहेत. 

टॅग्स :PuneपुणेLohgaonलोहगावVishrantwadiविश्रांतवाडीWarje Malwadiवारजे माळवाडी