शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

उद्यानांना फक्त जैविक खतांची मात्रा

By admin | Updated: December 30, 2014 00:20 IST

महापालिकेच्या उद्यानांसाठी मोशी येथील विघटनशील कचऱ्यापासूून खत निर्मिती (गांडूळखत) प्रकल्पातून मिळणाऱ्या जैविक खताचा सर्वस्वी वापर केला जात आहे.

पिंपरी : महापालिकेच्या उद्यानांसाठी मोशी येथील विघटनशील कचऱ्यापासूून खत निर्मिती (गांडूळखत) प्रकल्पातून मिळणाऱ्या जैविक खताचा सर्वस्वी वापर केला जात आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर पुर्णत: बंद झाला असून २ वर्षांपेसून त्यांची खरेदीच थांबली आहे. परिणामी जमिनीचा पोत सुधारत असल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली आहे. महापालिकेची सध्या १७१ उद्याने आहेत. यासह चौकांमध्ये, रस्तादुभाजकांवर हिरवळ तसेच, सुशोभिकरण केले आहे. रस्त्यांलगत व मोकळ्या जागेत चालू वर्षी २३ लाख वृक्षरोपांची लागवड झाली आहे. हिरवळ तसेच, झाडांना पोषण मिळण्यासाठी महापालिकेला आजवर मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा लागत असे. त्यासाठी वर्षाकाठी ८ लाख रुपये खर्च व्हायचा. महापालिकेने २४ जानेवारी २००४ रोजी जेएनएनयुआरएम योजनेतून बांधा वापरा हस्तांतरित करा तत्त्वावर गांडुळखत निर्मिती प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मोशी येथील ८१ एकरावर असलेल्या कचरा डेपोपैकी ५ एकरवर १२ वर्षाच्या कराराने प्रकल्प कंत्राटदारास हस्तांतरित केला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने ३ कोटी २० लाख रुपये खर्च करून प्रकल्पाचे शेड, कार्यालय धमारत, खत साठवणूकीस गोदाम बांधले आहे. त्यामध्ये गांडुळखत निर्मीतीसाठी १३२ कप्प्यांचे रॅक, १ हॉपर, १ कन्व्हेयर बेल्ट, १ ट्रॅक्टर लोडर, १ श्रेडर, वजन काटे, स्प्रिकलर यंत्रणेची व्यवस्था आहे. या प्रकल्पाची दिवसाला ३० टन कचरा विघटन करण्याची क्षमता आहे. महापालिका या प्रकल्पासाठी दिवसाला १२ ते १५ टन ओला कचरा (मंडई वेस्ट) पुरवते. यासह १५ ते १८ टन इतर कचरा दिला जातो. येथील कामगार, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि नेहमीच्या व्यवस्थापनाची जबाबदरी कंत्राटदाराची आहे. त्याने तयार केलेल्या गांडुळ खतापैकी प्रतिमहिन्याला ५० टन खत माफक (किमान आधारभुत किंमत प्रतिकीलोस ३ रु. ७५ पैसे) दरामध्ये महापालिकेला दिले जाते. उर्वरित खत खुल्या बाजारात विकण्याची मुभा असल्याची माहिती पर्यावरण विभागाने दिली आहे. या खताचा वापर महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे जमिनीचा पोत कालांतराने सुधारत असल्याने इतर रासायनिक खतांची मात्रा बंद करण्यात आल्याची माहिती उद्यान विभागाने दिली.(प्रतिनिधी)या प्रकल्पातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात गांडुळ खत मिळत आहे. त्यामुळे प्रकल्पाची परिणामकारकता आता खऱ्या अर्थाने दिसू लागली आहे. एकीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागली आहे. त्यातून साहजिकच प्रदुषण कमी होण्यास मदत झाली आहे. तर दुसरीकडे या कचऱ्यापासून खत निर्र्मितीचा विधायक उद्देश सफल झाला आहे. - संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिकाउद्यानांसाठी गरज असेल, तशी गांडुळखताची मागणी केली जाते. वर्षभरात ३०० टनापेक्षा अधिक खताचा वापर होतो. रासायणीक खतांची खरेदी २ वर्षांपासून थांबविली आहे. आता पुर्णपणे गांडुळखताचा वापर होत आहे. त्यामुळे मातीमधील जिवाणूंचे जतन होते. आधीची गांडुळे मरत नाहीत. परिणामी जमीन भुसभूषित होवून पोषणमुल्ल्यांतही सुधार झाला आहे. पुर्वी वारंवार खतांची मात्रा द्यावी लागायची. आता त्याची गरज भासत नाही.- सुरेश साळुंखे, मुख्य उद्यान अधिक्षक, पिंपरी-चिंचवड महापालिका