कान्हूरमेसाई - गेल्या चार वर्षांपासून जनतेला, अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने गोरगरीब जनतेवर अवघ्या एक किलो साखरेत दिवाळी साजरी करण्याची नामुष्की आणली आहे.शासकीय स्वस्त धान्य दुकानातुन गोरगरिबांना दिवाळी निमिताने प्रति कार्ड केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सरकार, जिल्हा प्र शासन व पुरवठा विभागाविरुद्ध जनतेत रोष पाहायला मिळतो आहे. राज्यात सव्वा पाच लाख रेशनकार्डधारक असून त्याची दिवाळी गोड करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने केली होती. त्यामुळे आता खूप काही आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा गोरगरीब कार्डधारकांना होती. साखरेचा दर २0 रुपये प्रतिकिलो राहणारं आहे. तर चार ते सहा जणांच्या कुटुंबाने किलोभर साखर दिवाळीसाठी पुरवणार कशी हा प्रश्न झाला आहे. सरकारस्तरावर दौरे बैठका उदघाटन, भूमिपूजन या माध्यमातून लोकप्रतिनिधी व अधिकाºयांकडून प्रचंड उधळपट्टी शासकीय तिजोरीतून सुरू आहे.तर दुसरीकडे गोरगरिबांना दिवाळीसारखा सर्वांत मोठ्या सणासाठी अवघी किलोभर साखर देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याने गरिबांमध्ये केंद्र व राज्यातील भाजपा सरकार विरोधात तीव्र असंतोष पाहावयास मिळत असल्याचे मराठा महासंघाचे शिरूर तालुका माजी अध्यक्ष भास्कर अण्णा पुंडे यांनी सांगितले.
गरिबांनो... किलोभर साखरेत करा दिवाळी! स्वस्त धान्य दुकानांतून मिळणार केवळ एक किलो साखर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 00:29 IST