शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
2
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
3
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
4
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
5
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
6
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
7
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
8
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
9
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
10
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
11
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
12
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
13
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
14
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
15
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
16
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
17
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
18
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
19
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
20
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख महिलांच्या तुलनेत केवळ ८६४ पुरूषाच्या नसबंदी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST

(रवीकिरण सासवडे) बारामती: स्त्री-पुरूष समानतेचा जागर आज सर्वत्र होत असला तरी ग्रामीण व शहरी भागातील कुटूंब नियोजनाची ...

(रवीकिरण सासवडे)

बारामती: स्त्री-पुरूष समानतेचा जागर आज सर्वत्र होत असला तरी ग्रामीण व शहरी भागातील कुटूंब नियोजनाची जबाबदारी महिलांवर टाकली जात आहे. पुरुषी अहंकार व वेगवेगळ्या गैरसमजापोटी पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेस टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात पाच वर्षात लाखभर महिलांच्या तुलनेत केवळ ८६४ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत.

नुकताच जागतिक पुरूष नसबंदी सप्ताह पार पडला. शहरी व ग्रामीण भागात पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेबाबतची अनस्था असल्यामुळे याबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती होणे गरजेचे आहे. लहान कुटूंब, सुखी कुटूंब ही संकल्पना मागील काही वर्षांमध्ये सर्वदूर पोहचली. यातुनच कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेने गती पकडली. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजन उपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची विशेष तरतूद केली आहे. मागील पाच वर्षांमध्ये पुणे जिल्ह्यात आरोग्य केंद्र अंतर्गत १ लाख २ हजार ६९८ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये केवळ ८६४ पुरुषांनी नसबंदी केली आहे. तर यामध्ये १ लाख एक हजार ८३४ महिलांचा समावेश आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या अनुसूचित जाती जमाती व दारिद्य्ररेषेखालील महिलांना ६०० रुपये तर सर्वसाधारण महिलांना २५० रुपये अनुदान दिले जाते. यामध्ये पुरुषांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवा यासाठी पुरूषांना १४०० रुपये अनुदान सरकारकडून दिले जात आहे. या अत्यंत सोप्या व गुंतागुत विरहीत शस्त्रक्रियेबाबत जनजागृती करण्यासाठी स्थानिक स्थरावर वैद्यकिय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका प्रयत्न करत आहेत.

पुणे जिल्ह्यात पाच वषार्तील नसबंदी दृष्टिक्षेपात

वर्षे पुरुष महिला एकूण

२०१५-१६ १६५ २३७२१ २३८८६

२०१६-१७ ३३१ २२६११ २२९४२

२०१७-१८ ८४ १८७१२ १८७९६

२०१८-१९ १३३ १९१४९ १९२८२

२०१९-२० १५१ १७६४१ १७७९२

स्त्रीयांच्या कुटूंबनियोजन शस्त्रक्रियेच्या तुलनेत पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण फारच कमी आहे. पुरूषांमध्ये असणारे याबाबतचे गैरसमज आणि समाजाची मानसिकता याला कारणीभूत आहे. नसबंदी शस्त्रक्रिया केली म्हणून पुरूषांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे.

- डॉ. भगवान पवार जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे जिल्हा परिषद

भारतीय समाजाचा असलेली पुरूषप्रधान संस्कृती याला कारणीभूत आहे. तसेच दबावापोटी किंवा इतर कारणांनी घरातील महिलाच कुटूंब नियोजनाची जबाबदारी स्वत:वर घेते. पुरूषांच्या नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये जास्त गुंतागुंत नसते. अगदी शस्त्रेक्रियेनंतर सबंधीत पुरूष दुसºया किंवा तिसºया दिवशी आपली दैनंदिन कामे पूर्वीप्रमाणेच करू शकतात. मात्र याबाबत समाजाची असलेली मानसिकतेमुळे पुरूषांच्या नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी आहे.

- डॉ. सदानंद काळे वैद्यकिय अधिक्षक बारामती उपजिल्हा रूग्णालय