स्वातंत्र्यसैनिक आर. बी. गुजर प्रशालेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक पाळी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण प्रशालेतील इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थिनींना देण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती चार दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी प्रशालेतील विद्यार्थिनींना मासिक पाळीचे महत्त्व, मासिक पाळीतील आहार, पूर्वापार चालत आलेले गैरसमज, पाळीच्या काळातील स्वच्छता तसेच किशोरावस्थेत आल्यानंतर होणारे शरीरातील बदल यावर प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका अलका सातपुते, अर्चना गोरे, सुमन जंगम यांनी इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थिनींना ऑनलाइन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी तांत्रिक साहाय्य प्रशालेच्या उपशिक्षिका प्रियांका नांदखिले व रूपाली ढमढेरे यांनी केले.
प्रास्ताविक प्रशालेच्या उपशिक्षिका हर्षदा परदेशी यांनी केले. आभार सोनाली शेळके यांनी मानले.
060921\1826-img-20210906-wa0028.jpg
?????? ?????? ???? ?????? ????????? ??????? ??????? ???? ????????