शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक वातावरणाच्या निर्मितीसाठी ऑनलाईन संगीत संध्या, ५ हजाराहून अधिक प्रेक्षकांनी लुटला आनंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 12:30 IST

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा नवा उपक्रम, संगीतातून सकारात्मक संदेश

ठळक मुद्देसोसायटीच्या विविध घटक संस्थांमधील ६५ हून अधिक शिक्षकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला

पुणे: लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक वातावरण आणि निखळ आनंदाची निर्मिती करण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने (डीईएस) आगळ्या-वेगळ्या ऑनलाइन संगीत संध्येचे आयोजन केले होते. सळसळता उत्साह आणि आत्मविश्‍वास प्रदान करणार्‍या या कार्यक‘माचा पाच हजाराहून अधिक प्रेक्षकांनी आनंद लुटला.

दोन दिवस चाललेल्या या संगीत सभेचा शुभारंभ नांदीने आणि समारोप भैरवीने करण्यात आला. मनाचा उत्साह वाढवणार्‍या, हलक्या-ङ्गुलक्या आणि उडत्या चालीच्या गाण्यांचा समावेश होता. मराठी आणि हिंदी भाषेतील बालगीते, भावगीते आणि भक्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. त्याला जोड होती विषयानुरूप चित्रकलेच्या प्रात्यक्षिकांची आणि वाद्य वादनाची. नैराश्य, ताणतणाव आणि भीतीचे मळभ दूर करीत उत्तरोत्तर ही संगीत मैफिल रंगत गेली.

सोसायटीच्या विविध घटक संस्थांमधील ६५ हून अधिक शिक्षकांनी या  कार्यक्रमात सहभाग घेतला. संगीत आणि चित्रकला शिक्षकांनी गेल्या महिन्यापासून तयारी करून घेतली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेच्या पदाधिकार्‍यांना व्यक्त होण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले. प्रत्येकाने या संधीचा मनसोक्त आनंद लुटला आणि आपल्या कलाविष्कारातून कलारसिकांना मंत्रमुग्ध केले. या वेळी बोलताना सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले म्हणाले, ‘संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या कल्पनेतून सन २०१४ पासून संगीत संध्या कार्यक्रम सुरू केला. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम करता आला नाही. यावर्षी संकटावर मात करीत डीईएस परीवाराने एकत्र येत कार्यक्रम निर्मितीचे शिवधनुष्य पेलले. चित्रपट, नाटक, संगीत, चित्रकला आदी माध्यमातून होणारे मनोरंजन आणि मिळणार्‍या निखळ आनंदाला आपण सर्व जण दीड वर्षांपासून मुकलो होतो. या कार्यक्रमामुळे सकारात्मकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल असा विश्‍वास वाटतो.

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmusicसंगीतcorona virusकोरोना वायरस बातम्या