शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लगाव बोली : पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी आता ऑनलाईन लिलाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 20:01 IST

आकर्षक नोंदणी क्रमांकासाठीची सध्याची ऑफलाईन लिलाव पध्दत लवकरच बंद केली जाणार आहे. लवकरच ऑनलाईन पध्दतीने हे लिलाव होणार असून ही प्रणाली विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे.

पुणे : आकर्षक नोंदणी क्रमांकासाठीची सध्याची ऑफलाईन लिलाव पध्दत लवकरच बंद केली जाणार आहे. लवकरच ऑनलाईन पध्दतीने हे लिलाव होणार असून ही प्रणाली विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयावरील ताण कमी होण्याबरोबरच वाहनचालकांचा त्रासही वाचणार आहे.

दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी अनेक वाहनमालकांकडून विविध आकर्षक नोंदणी क्रमांकाला मागणी असते. त्यासाठीची प्रक्रिया सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय पातळीवर ऑफलाईन पध्दतीने स्वतंत्रपणे राबवावी लागते. त्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे काही वेळा वाहननोंदणीही थांबवावी लागत असून वाहनमालकांसह प्रशासनाला त्रास होतो. त्यामुळे परिवहन विभागाने ही प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आकर्षक क्रमांकासाठी ऑनलाईन अर्ज व शुल्क स्वीकारले जाईल. क्रमांकाचा लिलावही ऑनलाईनच होईल. त्यामुळे वाहन मालकांना संबंधित क्रमांकासाठीची वाढीव रक्कम ऑनलाईनच नोंदवून भरता येणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली. 

प्रामुख्याने, १, १११, १००, १०००, ११११, ७८६ अशा विविध क्रमांकाला पसंती दिली जाते. हे क्रमांक राखून ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तीनपट शुल्क आकारले जाते. सध्या नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यापुर्वी कार्यालयाकडून याबाबतची माहिती प्रसिध्द केली जाते. त्यासाठी इच्छुकांकडून आगाऊ अर्ज भरून घेतले जातात. त्यासोबत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट व आवश्यक कागदपत्रे एका बंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावी लागतात. एकाच क्रमांकासाठी एकाहून अधिक अर्ज आले असल्यास त्याबाबतची माहिती सुचना फलकावर लावली जाते. त्यानुसार त्यात दिवशी पुन्हा बंद लिफाफ्यात त्यापेक्षा अधिक रकमेचा डीडी द्यावा लागतो. काही तासांत त्याच दिवशी सर्व अर्जदारांच्या उपस्थितीत लिफाफे उघडले जातात. जास्त रकमेचा डीडी असलेल्या वाहनमालकाला संबंधित आकर्षक क्रमांक दिला जातो. तर एकच अर्ज असलेल्या क्रमांकही अर्जानुसार राखून ठेवले जातात. पण ही प्रक्रिया राबविण्याचा ताण प्रशासनावर असतो. तसेच वाहनमालकांनाही कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात. ही प्रक्रिया आॅनलाईन झाल्यास हा त्रास वाचणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसonlineऑनलाइन