शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने केला वांधा; उत्पादनाचा खर्चही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 02:02 IST

कांदा उत्पादक शेतकरी संकटात

निमोणे : निमोणे (ता. शिरूर) आणि परिसरात रब्बी हंगामातील कांदाकाढणी सुरू झाली असूनही, कवडीमोल बाजारभाव असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. निमोणे परिसरातील करडे, आंबळे, चव्हाणवाडी, लंघेवाडी, मोटेवाडी, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, निर्वीसह एकूणच शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन होते. शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणारे नगदी पीक म्हणून आजपर्यंत याकडे पाहिले जात होते. तसे कांदा उत्पादन करणे जिकिरीचे, किचकट असून त्यासाठी खर्चही भरपूर येतो.एक एकर कांदा उत्पादनासाठी साधारण ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. शिवाय, तालुक्यात औद्योगिक वसाहत असल्याने शेतीकामांसाठी स्थानिक मजुरांचा तोटा भासतो. त्यासाठी बाहेरून मजूर आणावे लागतात. त्यासाठी शेतकºयाला जादा पैसे मोजावे लागतात. शिवाय, विजेचा आणि चासकमानच्या पाण्याचा नेहमी लपंडाव असतो. यासाठीही शेतकºयाला मोठा संघर्ष करावा लागतो. तालुक्याच्या नदीकाठच्या गावांमध्ये अनेक वर्षांपासून बागायती शेती व्यवसायामुळे जामिनाचा पोतच खराब झाला आहे. यामुळे उत्पादनक्षमता घटली आहे. किमान उत्पादन मिळविण्यासाठी जास्तीच्या खतांचा वापर करावा लागतो. तर, बदलत्या हवामानामुळे रोगराईचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. कमी प्रतीचा कांदा उत्पादन होते. त्याच्या निवारणासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांचा वापर करावा लागतो आणि या सर्वांमुळे उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो.या एकरामधून साधारण २०० ते २५० पिशव्या कांदा निघतो. सध्याच्या ५ ते ७ रुपये प्रतिकिलोग्रॅम या बाजारभावाने त्याचे १० हजार ते १५ हजार रुपये मिळतात. म्हणजे एवढे पाच महिने काबाडकष्ट करूनही एकरी ३० ते ४० हजार रुपयांचा तोटा होतो. कमी प्रतीचा कांदा असेल तर पदरात दमडीही पडत नाही. बळीराजाला रिकाम्या हाताने परतावे लागते. सलग तीन वर्षांपासून ही स्थिती आहे. मागील वर्षीचा कांदा बाजारभावाच्या अपेक्षेने ठेवलेला तसाच पडून आहे. तो सडायला लागलाय. नवीन कांदापण काढणीला आलाय. या सर्व कांद्याचे करायचे काय? असा शेतकºयांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. तीन वर्षांपासून शेतकरी कांदा फेकून देत असल्याने कर्जाचा डोंगर वाढतोय. या कर्जाच्या ओझ्याखाली बळीराजा पुरता गाडला गेला आहे.या कांदाशेतीने शेतकºयांचे अर्थकारण पूर्णत: बिघडले आहे. कांदा उत्पादनच काय, पण शेतीच करावी की नाही? असा गहन प्रश्न शेतकºयापुढे यांपुढे निर्माण झाला आहे. शेती आणि शेतकरी संपविण्याचे शासनाचे हे धोरण आहे.- संतोष भाऊसाहेब काळे,कांदा उत्पादक शेतकरीसरकारने शेतकºयांवर आपल्याच तोंडात मारून घेण्याची वेळ आणली आहे. एवढ्या मोठ्या कष्टाने, रात्रीचा दिवस करून पिकविलेला कांदा मातीमोल भावाने विकताना शेतकºयांच्या डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. तर, काही शेतकरी वाटखर्चाला मोताद झाले आहेत. बळीराजाची ही क्रूर चेष्टा थांबण्याची गरज आहे.कर्जमाफी आणि पॅकेजच्या पोकळ घोषणा करून या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याऐवजी त्याच्या शेतमालास योग्य भाव दिल्यास कोणत्याही योजनेची या जगाच्या पोशिंद्याला गरज भासणार नाही, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.

टॅग्स :onionकांदा