शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

कांदा ६ ते ९ रुपये किलो

By admin | Updated: March 13, 2016 01:37 IST

एकेकाळी गगनाला भाव भिडल्याने ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या कांदा ६ ते ७ रुपये किलोने विकला जात असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे़

चाकण : एकेकाळी गगनाला भाव भिडल्याने ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या कांदा ६ ते ७ रुपये किलोने विकला जात असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे़ चाकण मार्केट यार्डात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आवक वाढल्याने कांदा जनावरांच्या बाजारात ठेवावा लागतोे. चाकण बाजारात शनिवारी १९ हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटल ६०० ते ९०० रुपये भाव असल्याने शेतकरीवर्गात मोठी नाराजी आहे. चाकण परिसरात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेत आहेत. या वर्षी चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; मात्र त्यांची निराशा झाली़यंदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा होता़ चाकण परिसरातील शेतकऱ्यांनी कांदारोपे तयार करून व महागडी रोपे घेऊन कांदालागवड केली. आठ ते नऊ रुपये किलो दराने भाव मिळत असल्याने उत्पादनखर्चही निघत नाही, अशी खंत कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मजुरी खर्चही परवडत नसल्याने हमीभाव मिळावा, अशी मागणी य्जेजेराम टेमगिरे, वसंत तनपुरे, बाळासाहेब काळडोके, भरत हुंडारे, रघुनाथ टेमगिरे, सुदाम सावंत, रोहिदास गोपाळे, संभाजी पाचपुते यांनी केली आहे.कांदापिकाला लागवड, मजुरी, बियाणे, खते, औषधे, काढणी यासाठी एकरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. परंतु, भाव गडगडल्याने एकरी २५ ते ३० हजार रुपये मिळत असून, शेतकऱ्यांना एकरी ५ ते १० हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे. हमीभाव नसल्याने मुद्दल खर्चही निघत नाही.- वसंत तनपुरे (गोनवडी)कांदालागवडीसाठी येणारा खर्च, पाणी, औषधे आणि मजुरीही निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गेले चार महिने कांदालागवड केल्यापासून कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा होती. मात्र, बाजारात कांद्याची प्रचंड आवक होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले आहे.- भरत हुंडारे (पिंपरी बुद्रुक)