शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनासाठी दीड हजार कोटींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 01:45 IST

महापालिकेच्या विकास प्रकल्पांना जागा देण्यासाठी नागरिकांकडून रोख मोबदल्याची मागणी वाढत आहे.

पुणे : महापालिकेच्या विकास प्रकल्पांना जागा देण्यासाठी नागरिकांकडून रोख मोबदल्याची मागणी वाढत आहे. शहरामध्ये करण्यात येणाऱ्या विविध १६ प्रकल्पांसाठी तब्बल १ हजार ३०० कोटी रुपये लागणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. नागरिकांच्या रोख मोबदल्याच्या मागणीमुळे मात्र महापालिकेची चांगलीच अडचण झाली आहे.नवीन भूसंपादन कायद्यानुसार, नागरिकांना योग्य मोबदला मिळत असल्यामुळे जागा भूसंपादनाची प्रक्रियेला वेग आला आहे.२०१३ मध्ये भूसंपादन कायद्यामध्ये बदल करण्यात आल्यामुळे आता नागरिकांना योग्य मोबदला मिळत आहे. नागरिकांना बाजारमूल्यापेक्षा चारपट मोबदला मिळत आहे.यामुळे महापालिकेला मात्र जागा भूसंपादनासाठी अधिकची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करावी लागत आहे. महापालिकेच्या भूसंपादन विभागाने यावर्षी १६०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.३४ कोटी रुपयांची तरतूद : प्रकल्प खर्चामध्येच भूसंपादनाची सोयमहापालिका प्रशासनाला रस्ते, उद्याने, पाण्याच्या टाक्या अशा प्रकल्पांसाठी जागेचे भूसंपादन करावे लागते. मागील वर्षी अंदाजपत्रकामध्ये ३४ कोटी रुपयांची तरतूद पालिका प्रशासनाने केली होती. चांदणी चौक उड्डाणपूल, चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्या, एचसीएमटीआर रस्ता, कात्रज कोंढवा रस्ता, कचरा प्रकल्पासाठी यावर्षी भूसंपादन सुरू करण्यात आले आहे.याविषयी, महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या बैठकीमध्ये १६०० कोटींची मागणी विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन एफएसआय (चटईक्षेत्र) टीडीआर यांच्या माध्यमातून जागा घेण्याचा प्रयत्न करते. नागरिकांना रोख मोबदला हवा आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी धोरणात्मक निर्णय घेतला असून मोठ्या प्रकल्पांसाठी थेट प्रकल्प खर्चामध्येच भूसंपादनाची तरतूद करण्यात येणार आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे