पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून तसेच पैशांवरून होणाऱ्या किरकोळ वादामधून पर्वतीजवळील लक्ष्मीनगर येथे नर्सरी चालवणाऱ्या एकाचा खून करण्यात आला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह चादरीमध्ये गुंडाळून आरोपी दांपत्य मध्य प्रदेशाकडे पसार झाले आहे. आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्या शोधासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिली आहे.चंद्रिकाप्रसाद मंगलप्रसाद यादव (वय ४०, रा. पर्वती) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी उदमसिंग ठाकूर (वय ४२), पूनम उदमसिंग ठाकूर (वय ३५, दोघेही रा. जनता वसाहत) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.खुनाच्या घटनेची माहिती मिळताच डॉ. सुधाकर पठारे, मिलिंद मोहिते, श्रीधर जाधव, स्मिता जाधव, दत्ताजी मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. यादव बुधवारी दुपारपासून बेपत्ता झाला होता. याबाबत दत्तवाडी पोलिसांनी मिसिंगची तक्रारही दाखल करून घेतली होती. (प्रतिनिधी)
अनैतिक संबंधांमधून पर्वतीमध्ये एकाचा खून
By admin | Updated: September 25, 2015 01:37 IST