शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सवतींच्या भांडणात एकीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:52 IST

येथील कामराजनगरमध्ये राहणाºया सारिका सुनील राठोड (वय ४२) आणि बीना सुनील राठोड (वय ३०) या दोघी सवतींच्या भांडणात सारिका राठोड यांचा खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आली.

येरवडा - येथील कामराजनगरमध्ये राहणाºया सारिका सुनील राठोड (वय ४२) आणि बीना सुनील राठोड (वय ३०) या दोघी सवतींच्या भांडणात सारिका राठोड यांचा खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी येरवडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन आणि गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी पोलीस फौजफाट्यासह भेट दिली. आरोपी बीना राठोड यांना येरवडा पोलिसांनी अटक केली असून तिला ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवले आहे.पूनम संजय चव्हाण (वय २८, व्यवसाय गृहिणी, रा. सर्व्हे नं. १०, कामराजनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पूनम या त्यांच्या पती, दोन मुले, बहीण सारिका राठोड हिची दोन मुले गंगा ऊर्फ सोना आणि दर्शना ऊर्फ मोना यांच्यासह राहण्यास आहेत. पूनम यांचे पती खासगी कंपनीमध्ये हाऊसकीपिंगचे काम करतात. त्या घरीच असतात. त्यांची बहीण सारिका राठोड हिचे १५-१६ वर्षांपूर्वी सुनील राठोड यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. त्यांना वरीलप्रमाणे दोन मुली आहेत. सुनील हे इस्टेट एजंटचे काम करतात. ते दोघे पती-पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब पूनम यांच्या घरासमोरच राठोड यांच्या मोठ्या भावाच्या घरात राहण्यास आहेत. सुमारे ५-६ वर्षांपूवी सुनील राठोड यांची पूर्वी लष्कर कॅम्प भागात राहण्यास असलेल्या बीना हिच्याशी ओळख होऊन नंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले. राठोड यांनी बीना हिला दुसरी पत्नी म्हणून स्वीकारून तिला प्रथम अशोकनगर येथे आणि त्यानंतर तिला गणेशनगरमधील अंचू चायनिज सेंटर समोरील गल्लीमधील घरात आणून ठेवले होते. पर्णकुटी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सुशील बोबडे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा