शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एक सदस्यीय प्रभाग रचनेमुळे राजकीय समीकरणे बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात एक सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पक्षाच्या मतांपेक्षा उमेदवार व त्याचा वैयक्तिक जनसंपर्क अधिक महत्त्वाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात एक सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पक्षाच्या मतांपेक्षा उमेदवार व त्याचा वैयक्तिक जनसंपर्क अधिक महत्त्वाचा ठरणार असून, लोकसंख्येच्या आधारावर होणाऱ्या या रचनेमुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे हे इच्छुक उमेदवारांसमोर आव्हान असणार आहे़

चार सदस्यीय प्रभाग रचना व केंद्र तथा राज्यातील सत्ता यामुळे सन २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत भाजपला फायदा झाल्याचे दिसून आले़ परंतु, एक अथवा दोन सदस्यीय प्रभाग रचनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाल्याचाही इतिहास आहे़ सन २००७ मध्ये एक सदस्यीय प्रभाग असताना व २०१२ मध्ये दोन सदस्यीस प्रभाग असताना राष्ट्रवादी काँग्रेसच बहुमताने विजयी झाले़ त्यातच आता नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य लक्षात घेता, एक सदस्यीय प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसला फायदेशीर ठरणार असे दिसून येत आहे़ त्यामुळे या पक्षाला बहुमत मिळाले नाही तरी महापालिकेतील सत्तांतर अटळ आहे़

आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र लढतील अशी शक्यता सध्या तरी नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यांवरून दिसून येत आहे़ त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विद्यमान ९ सदस्य कमी होणार की, काँग्रेस पुन्हा शहरात उभारी घेणार हे लवकरच दिसून येईल़ परंतु, या सर्वांमध्ये आता पक्षांच्या मतांपेक्षा वैयक्तिक जनसंपर्क, समाजपयोगी काम, प्रभागातील वर्चस्व याबाबी वरचढ ठरणार आहे़ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युती झाली, तरी शिवसेनेच्या वाट्याला त्यांची शहरातील ताकद लक्षात घेता फारशा जागा येतील अशी शक्यताही नाही़ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात अधिक लक्ष घालून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला असल्याने, मनसेची सदस्य संख्या दोनहून पुन्हा दोन आकडी संख्या पार करणार का हेही महत्त्वचे ठरणार आह़े़ दरम्यान, रिपब्लिकन पक्ष, वंचित आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवली तर शहरातील काही भागात त्यांची व्होट बँक मोठी असल्याने त्यांचीही संख्या यावेळी निश्चित वाढेल असे चित्र आहे़

बहुमताची शक्यता धूसर

दोन सदस्यीस अथवा चार सदस्यीय प्रभाग रचनेत पक्षातील एका ताकदवार उमेदवारामुळे अन्य उमेदवारांना फायदा झाल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे़ पण, आता एक सदस्यीय प्रभागामुळे शहरातील सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत़ सध्या शहरातील तीनही प्रमुख पक्ष आमच्यासाठी ही निवडणूक सोपी असल्याचे सांगत आहेत़ परंतु, साधारणत: २० ते २३ हजारांच्या लोकसंख्येच्या प्रभागात किती मतदान तेथील इच्छुक स्वत:कडे वळू शकतात यावर पुढील गणिते अवलंबून राहतील़ यामध्ये पक्षाच्या कामाचाही वाटा असेल पण तो तुलनेने कमीच राहणार आहे़ यामुळे आगामी निवडणुकीत कोण्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल अशी शक्यता आतातरी धूसर वाटत आहे़

----------------------------