शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

चाकणला चक्रेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त एक लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 17:15 IST

महाशिवरात्री निमित्त चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात व पंचक्रोशीतील महादेव मंदिरांमध्ये आज एक लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. दक्षता म्हणून मंदिर परिसरात चाकण पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस पथक व साध्या वेशात दामिनी व निर्भया पथक तैनात करण्यात आले होते.

 - हनुमंत देवकरचाकण (पुणे) - महाशिवरात्री निमित्त चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात व पंचक्रोशीतील महादेव मंदिरांमध्ये आज एक लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. दक्षता म्हणून मंदिर परिसरात चाकण पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस पथक व साध्या वेशात दामिनी व निर्भया पथक तैनात करण्यात आले होते. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची आज पहाटे पासूनच अलोट गर्दी उसळली होती. चाकण येथील चक्रेश्वर मंदिर व परिसरातील खराबवाडीतील महादेव मंदिर, महादेव डोंगर येथे जावून लाखो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.चाकण येथे चक्रेश्वर मंदीर हे पुरातन व जागृत देवस्थान आहे. या मंदिरात शिवलिंग असून दर्शनासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मोठी गर्दी झाली होती. मंदिराच्या मंडपात अभिषेक करण्यात आले. चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, चक्रेश्वर विकास समिती, चक्रेश्वर अंत्योदय सेवा समिती व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण यांच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. महाशिवरात्री मुळे परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. अवघा चाकण परिसर शिवमय होऊन भक्तीरसात चिंब झाला होता. मंदिरापासून ३०० मीटर पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिर आवारात भाविकांसाठी रांगेत दर्शन घेताना उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मंडप घालण्यात आला होता. दर्शनासाठी नवसह्याद्रीच्या कमानीपासून रांगा लागल्या होत्या. येथील मंदिर आवारात भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमासह अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. महाशिवरात्रीनिमित्त हभप अरविद महाराज शर्मा यांची कीर्तनसेवा झाली. भाविकांना खिचडी, केळी, ताक व पाणी वाटप  दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जय भोले अमरनाथ सेवा मंडळ, चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट, नगरसेवक प्रकाश भुजबळ युवा मंच व बोल्हाईमाता मित्र मंडळ आदी सेवाभावी संघटनांच्या वतीने केळी व खिचडीचे वाटप करण्यात आले. येथील श्रीनाथ ज्वेलर्सच्या वतीने विवेक माळवे यांनी भाविकांना ताक वाटप केले. देवस्थान ट्रस्टने मंदिरात पुजेची चोख व्यवस्था केली होती. अमरनाथ सेवा मंडळाचे रामदास आबा धनवटे, गेसस्टॅम्पचे मनुष्यबळ सरव्यवस्थापक शिवाजी चौधरी, किरण गवारी, पांडुरंग गोरे, शांताराम जाधव, शेखर पिंगळे, जीवन जाधव, संजय मुंगसे यांनी फराळाचे वाटप केले. खराबवाडीत पारायण सोहळा व हरिनाम सप्ताह  खराबवाडी येथील महादेवाच्या डोंगरावर व पाण्याच्या टाकीजवळील महादेव मंदिरात भाविकांनी अभिषेक करून शिवलिंगाचे दर्शन घेतले. महादेवाच्या डोंगरावर माजी सरपंच हनुमंत कड यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. हभप डॉ. लक्ष्मण महाराज राऊत, तानाजी महाराज शिंदे यांची कीर्तनसेवा संपन्न झाली. हभप विशाल महाराज इंगळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. येथील हनुमान मंदिरात विजयकाका पुजारी व महिला बचत गटांच्या कार्यकर्त्या रेवती कड, माधुरी खराबी, दीपाली खराबी, रंजना देवकर, मंगल देवकर, चारुशीला माने, नूतन कड, अनिता कड, पारुबाई कड, नंदा कड, कल्पना खराबी, शर्मिला खराबी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिलांनी सामूहिक रित्या ‘शिवलीला अमृत’ ग्रंथाचे पारायण केले.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीcultureसांस्कृतिकHinduismहिंदुइझमPuneपुणे