अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान श्रीक्षेत्र सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पहाटे चार वाजल्यापासून सुरुवात झाली. त्यापुर्वी देवस्थानचे पदाधिकारी ,ग्रामस्थ ,पुजारी यांनी अभिषेक घालून मंदिर दर्शानासाठी भाविकाना खुले करण्यात आले .
सिद्धिविनायक गणपतीला दुपारी बारा वाजता खिचडीचा नैवेद्य दाखवण्यात आला तसेच भाविकांना दर्शन लवकर मिळावे यासाठी देवस्थानकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिंचवड देवस्थानकडून आलेल्या भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लावण्यात येत होते.त्यामुळे भाविकाचे दर्शन लवकर होत होते.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे येथील बाजारपेठेतील लहान-मोठे उद्योग अगदी जोरात चालू असल्याचे चित्र होते .येथे आलेल्या भाविकांमुळे प्रत्येक दुकानदाराचा फायदा होतो सरासरी पंचवीस ते तीस लाख रुपयांची उलाढाल अंंगारक चतुर्थी निमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे होत आहे.
अष्टविनायकातील मुख्य स्थान असल्याने याठिकाणी विशेष महत्व आहे. याठिकाणी भीमा नदी दुथडी भरुन वाहत आहे. उशिरापर्यत भाविक दर्शन घेत आहे.