शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकरला एक लाख भाविकांनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:14 IST

‘ओम नम: शिवाय, ओम नम: शिवाय- हर हर बोले नम: शिवाय’च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे एक लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.

घोडेगाव - ‘ओम नम: शिवाय, ओम नम: शिवाय- हर हर बोले नम: शिवाय’च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे एक लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. या वर्षी सर्वत्र चांगला पाऊ स झाल्याने श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून गर्र्दी दिसत आहे.रविवारी वहातूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, सोमवारी रस्त्यावर कुठेही वहातूककोंडी झाल्याचे दिसले नाही. भीमाशंकरमधील हॉटेल, पेढे व प्रसादाच्या दुकानांवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळाचे स्वयंसेवक मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम केले.देवस्थानाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश कौदरे, कार्यकारी विश्वस्त अर्चना यादव, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, आंबेगावचे तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार हे यात्रेचे नियोजन करीत होते.भीमाशंकरकडे येणाऱ्या वाहनांसाठी ४ किलोमीटर अलीकडे निगडाळे गावाजवळ वाहनतळ करून तेथेच सर्व वाहने थांबवली आहेत. येथून एसटी महामंडळाच्या बसने सर्व भाविक भीमाशंकरपर्यंत जात आहेत. या नियोजनामुळे कुठेही वाहतूककोंडी झाली नाही. तसेच, भीमाशंकर यात्रेसाठी वाहनतळापासून मंदिरापर्यंत चोख बंदोबस्त नेमण्यात आला आहे; त्यामुळे दर्शन व्यवस्थित व लवकर होत आहे. असेच नियोजन पूर्ण श्रावण महिनाभर असेल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी सांगितले.भीमाशंकर यात्रेच्या दोन्ही नियोजन बैठकांत प्लॅस्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, भीमाशंकरमध्ये सर्वत्र प्लॅस्टिक कचरा पडलेला दिसत होता. मंदिराच्या मागील रस्त्यावर, बस स्थानकाजवळ, वाहनतळांच्या ठिकाणी, पायºयांच्या बाजूला, भीमा नदीपात्रात सर्वत्र घाण व प्लॅस्टिक कचरा पसरलेला होता.भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार यात्रेसाठीदेवस्थानाने पूर्ण तयारी केली असून गाभाºयातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन लवकर व्हावे, यासाठी अभिषेक बंद ठेवण्यात आले आहेत.श्रावणाच्या पहिल्यादिवशी म्हणजे रविवारी वहातूककोंडी झाली. एसटी महामंडळाच्या मिनीबस न मिळाल्याने दोन मोठ्या गाड्या छोट्या रस्त्याने पास होऊ शकल्या नाहीत; त्यामुळे ही समस्या निर्माण झाली.सोमवारी पोलिसांनीकेलेल्या नियोजनामुळे वाहतूककोंडी झाली नाही. देवस्थानाने खासगी मिनीबस ठेवण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारी दुपारपासून या मिनीबस सुरू झाल्या आहेत.तसेच, ऐन वेळी गरज पडल्यास स्थानिक छोट्या गाड्यांना पोलिसांनी परवानगी द्यावी, अशी माहिती भीमाशंकर देवस्थानाचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी दिली.

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरPuneपुणे