शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

ट्रक अपघातात एक ठार

By admin | Updated: July 2, 2017 02:09 IST

येथे पुणे-सोलापूर महामार्गावर उभ्या ट्रकला पाठीमागून मालवाहू दुसऱ्या ट्रकची धडक होऊन ट्रकच्या क्लीनरचा उपचारादरम्यान मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कयवत : येथे पुणे-सोलापूर महामार्गावर उभ्या ट्रकला पाठीमागून मालवाहू दुसऱ्या ट्रकची धडक होऊन ट्रकच्या क्लीनरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ट्रकचालक जखमी झाला. अपघातात क्लीनर उमेश मोदाळे (वय २५, रा. लोहारा, जि. उस्मानाबाद) यांचा गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ट्रकचालक ज्ञानेश्वर बळी कांबळे (वय २९, रा. हिप्परगा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) हे जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.२९) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला. मालट्रक (एमएच४३ वाय २५५५) मुंबई येथून मशिनरी भरून चेन्नईकडे जात होता. या वेळी महामार्गावर दुसरा ट्रक (एमएच४२ बी ८०८९) उभा होता. या उभ्या ट्रकवर मशिनरी भरलेला ट्रक पाठीमागून धडकून अपघात झाला. या अपघातात क्लीनर उमेश मोदाळे गंभीर जखमी झाला. त्याला यवत येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान मोदाळे यांचा मृत्यू झाला. बेशिस्त पार्किंग यवत येथे महामार्गांच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत वाहनचालक वाहने महामार्गावरच उभी करतात. उभ्या वाहनांचा अंदाज न आल्यामुळे असे अपघात सतत घडत असतात. यामुळे वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागत आहे. गावातील महामार्गाचा सेवारस्ता तर ट्रान्सपोर्टवाले त्यांच्या मालकीचा समजू लागले आहेत. अनेक ट्रक एका रांगेत सेवारस्त्यावर उभे केले जातात. यात पूर्ण सेवारस्ता अडवला जातो, मात्र यावर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करत आहे.