शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघातात एक ठार

By admin | Updated: April 30, 2017 04:49 IST

पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण येथील मुख्य रस्त्यावरच अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाने पाठीमागून ठोकर दिल्याने घडलेल्या अपघातात एक जण

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण येथील मुख्य रस्त्यावरच अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाने पाठीमागून ठोकर दिल्याने घडलेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी सातच्या सुमारास घडली.याच जागेवर अनेक अपघात घडून बऱ्याच जणांचे जीव जाऊनही हायवे प्रशासन आणि महामार्ग पोलीस कोणतीही दखल घेत नसल्याने या पुढील अपघातात त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करावी अशी मागणी पुढे येत आहे.भिगवण येथे पुणे सोलापूर महामार्गावर सौरभ रोडलाइन्सची मालवाहतूक करणारी ट्रक (एमएच १४,४५६२) मुख्य रस्त्याच्या कडेला पार्किंग करून ड्रायव्हर नाष्ट्यासाठी गेला असताना पाठीमागून पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने (एमएच ०४ एच.डी. ५८९०) जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की यात बसलेले करीम फकरुद्दीन शेख (रा.सना हौसिंग सोसायटी सेक्टर नं.१ कळंबोली) यांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो ड्रायव्हर शिवकुमार टेलरवाणी (रा.करारा बाजार) हे गंभीर जखमी झाले. दोन गाड्यांच्या धडकेच्या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात एवढा भीषण होता की यात मृत व्यक्तीच्या डोक्याची हाडे दूरपर्यंत फेकली गेली होती. तसेच घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. याठिकाणी अनेक अपघात होऊनही अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्यानेच अपघात घडला आहे. याप्रकरणी ट्रकड्रायव्हर मेहबूब हनीफ मुलाणी (रा. जयप्रकाशनगर पुणे) याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.