दौंड : स्वामी चिंचोली (ता. दौंड) परिसरात जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. सुरैय्या बेगम अब्दुल नजीर शेख (वय ३५, रा. मुम्मानी कॉलनी, बिदर, कर्नाटक) ही जीपमधील प्रवासी महिला जागीच ठार झाली. तर अन्य नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. ठाणेअंमलदार दत्तात्रय माने यांनी दिलेल्या माहितीनुसार जीप (के. ए. ३५, ७३९३) प्रवासी घेऊन कर्नाटकातील बिदर येथून पुण्याकडे एका कार्यक्रमासाठी निघाली होती. ही जीप स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत येताच जीपवरील चालक मुसा याचा गाडीवरील ताबा सुटल्याने जीप पलट्या मारत एका खड्ड्यात पडली.
अपघातात एक ठार; नऊ जखमी
By admin | Updated: May 11, 2015 06:01 IST